अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 05:51 PM2021-02-27T17:51:29+5:302021-02-27T17:53:23+5:30

Accident Ratnagiri- महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

Highway Mrityunjay Doot Yojana for accident victims from March 1 | अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून

Next
ठळक मुद्दे अपघातग्रस्तांसाठी हायवे मृत्युंजय दूत योजना १ मार्चपासून महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण कमी करण्याकरिता योजना

आबलोली : महामार्गावरील अपघाताचे वाढते प्रमाण पाहता घडणारे अपघात व वाढणारे मृत्यूचे प्रमाण ही संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. हे प्रमाण कमी करण्याकरिता १ मार्च २०२१ पासून महाराष्ट्र राज्याचे महामार्ग पोलीस विभागप्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या संकल्पनेतून हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यात राबविण्यात येणार आहे.

अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना उपचाराकरिता योग्य वेळी रुग्णालयात नेले जात नाही किंवा अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना व्यवस्थित न हाताळल्याने जखमी व्यक्तीच्या शरीरास अधिक इजा होते व मृत्यूचे प्रमाण वाढते. या करिता ह्यगोल्डन अवरह्ण मध्ये अपघातग्रस्तांना व्यवस्थितरित्या रुग्णालयात नेता यावे व त्यांना योग्य उपचार त्वरित मिळण्यासाठी राज्य महामार्ग पोलीस विभागातर्फे हायवे मृत्युंजय दूत योजना राज्यातील महामार्गावर राबविण्यात येणार आहे.

महामार्ग अखत्यारितील महत्त्वाचे राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील सर्व मॉल, पेट्रोल पंप, ढाबा किंवा हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी तसेच महामार्ग लगतचे गावातील चार ते पाच लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना मृत्युंजय दूत नावाने संबोधण्यात येणार आहे. या देवदूत व्यक्तींना अपघातग्रस्त व्यक्तीस कसे हाताळावे किंवा कसे उचलावे याबाबतचे प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या प्रत्येक ग्रुपला एक स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येणार आहे.

महामार्ग सुरक्षा पथकाकडून देणार ओळखपत्रे

महामार्ग तयारीतील राष्ट्रीय व राज्य महामार्ग नजीकच्या हॉस्पिटलची नावे पत्ते व संपर्क क्रमांक अद्ययावत करण्यात येणार आहे. रुग्णवाहिका १०८ हा दूरध्वनी क्रमांक आहे. याबाबत माहिती देवदुतांना देऊन इतर खासगी व इतर रुग्णालय संलग्न असणाऱ्या रुग्णवाहिकांची माहिती सुद्धा देण्यात येणार आहे. हायवे मृत्युंजय दूत यांना अपघात प्रसंगी मदत करताना कोणतीही अडचण येऊ नये, याकरिता महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्रे देण्यात येणार आहेत.

Web Title: Highway Mrityunjay Doot Yojana for accident victims from March 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.