रत्नागिरीत १५ एप्रिलला दणाणणार हिंदू गर्जना मोर्चा

By अरुण आडिवरेकर | Published: April 5, 2023 04:21 PM2023-04-05T16:21:11+5:302023-04-05T16:21:32+5:30

माेर्चाचा प्रचार गावांमध्येही करण्यात येणार

Hindu Garjana Morcha will be held in Ratnagiri on 15th April | रत्नागिरीत १५ एप्रिलला दणाणणार हिंदू गर्जना मोर्चा

रत्नागिरीत १५ एप्रिलला दणाणणार हिंदू गर्जना मोर्चा

googlenewsNext

रत्नागिरी : येथील सकल हिंदू समाजातर्फे शनिवार, १५ एप्रिल २०२३ राेजी सायंकाळी ४ वाजता हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात येणार आहे. या माेर्चाच्या नियाेजनाठी बैठकीचे आयाेजन करण्यात आले हाेते. या बैठकीला विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्थांचे १०० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मोर्चाच्या प्रसार, प्रसिद्धी आदींचे नियोजन करण्यात आले.

हिंदूराष्ट्र सेनेचे चंद्रकांत राऊळ यांनी सांगितले की, आज स्वतंत्र भारतामध्ये हिंदू धर्म आणि हिंदूधर्मीय यांच्यावर लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, देवतांचे विडंबन आदी आघात सातत्याने होत आहेत. याविषयी हिंदूंमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि हिंदूंचे संघटन व्हावे, या उद्देशाने हिंदू गर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाची सुरुवात शिवतीर्थ, मारुती मंदिर येथे होऊन जयस्तंभ बाजारपेठ मार्गे मोर्चाची सांगता स्वातंत्र्यलक्ष्मी चौक येथे होणार आहे. या मोर्चाला हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई हे संबोधित करणार आहेत.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष राकेश नलावडे म्हणाले की, कोणा एका संघटनेने हा मोर्चा आयोजित केलेला नसून समाजातील सर्व हिंदूंनी एकत्र येऊन या मोर्चाचे आयोजन केलेले आहे. या माेर्चाचा प्रचार गावांमध्येही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीला चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, संजय जोशी, श्रीरंग प्रभुदेसाई, राजू तोडणकर, गजानन करमरकर, दीपक देवल, मंदार देसाई, हिमांशु देसाई, तेजस साळवी, गणेश गायकवाड, दीपक जोशी यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटना, संप्रदाय, मंडळे, ज्ञाती संस्था आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Hindu Garjana Morcha will be held in Ratnagiri on 15th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.