होळीमुळे एसटीची झोळी भरलेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:30 AM2021-03-28T04:30:07+5:302021-03-28T04:30:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सव उत्त्साहात साजरा करण्यात येतो. कोराेनामुळे सणावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. ग्रामस्तरावरही ...

Holi is full of ST bags | होळीमुळे एसटीची झोळी भरलेली

होळीमुळे एसटीची झोळी भरलेली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात शिमगोत्सव उत्त्साहात साजरा करण्यात येतो. कोराेनामुळे सणावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. ग्रामस्तरावरही उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी मुंबईकर मात्र उत्सवासाठी गावी येऊ लागले आहेत. रत्नागिरी विभागात मुंबईकडून जादा गाड्या सोडण्यात येत असून दि. २ एप्रिलपर्यंत १६५ जादा गाड्या मुंबई व उपनगरातून येणार आहेत.

ग्रामदेवतेची पालखी शिमगोत्सवात घरोघरी येते. यावर्षी पालखी घरोघरी येणार नसली तरी सहाणेवर भाविकांना दर्शनासाठी थांबणार आहे. काही गावातून पालखी मंदिरातच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोराेना रुग्ण वाढत असल्याने संसर्ग बळावू नये, यासाठी शासनाने निर्बंध जारी केले आहेत. शासनाच्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असला तरी भाविक ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी गावी येत आहेत. मुंबईकरांसाठी रत्नागिरी विभागातील नऊ आगारातून जादा १६५ गाड्यांचे नियाेजन करण्यात आले असून प्रवाशांचा त्यासाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानंतरच गाड्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

n मुंबई, तसेच उपनगरातून होळीसाठी १६५ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

n दररोज १५० गाड्या मुंबई व उपनगरे, पुणे मार्गावर साेडण्यात येत आहेत.

n कर्नाटक राज्यातील गाड्या सध्या बंद असून कोल्हापूरपर्यंत साेडण्यात येत आहे.

n ग्रामीण असो वा शहरी तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहेत.

दररोज १५० गाड्या

जिल्ह्यात नऊ आगारातून मुंबई तसेच उपनगरे व पुणे मार्गावर दररोज १५० गाड्या सोडण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद चांगला लाभत असल्यामुळे अद्याप एकही गाडी कमी करण्यात आलेली नाही. शिवशाही, लालपरी बसेसना प्रवाशांची पसंती लाभत आहे. गर्दी असो वा नसो एसटीचे तिकीट दर बदलत नसल्याने प्रवाशांना खात्री आहे.

जिल्ह्यात भद्रे व तेरसे असे दोन प्रकारचे शिमगे साजरे होत असल्याने दि.२५ पासूनच जादा गाड्यांचे आगमन सुरू झाले आहे. दि.२ एप्रिलपर्यत गाड्या जिल्ह्यात येणार आहेत. मास्कशिवाय प्रवाशांना एसटीत प्रवेश दिला जात नाही. शिवाय सॅनिटाझर वापरण्याची सूचनाही केली जात असून प्रवासी त्याचे पालन करीत आहेत.

- सुनील भोकरे,

विभाग नियंत्रक, रत्नागिरी

रत्नागिरी विभागातून दररोज मुंबई, बोरीवली, नालासोपारा, ठाणे, विरार, कल्याण, विठ्ठलवाडी, पुणे, स्वारगेट मार्गावर दररोज १५० गाड्या नियमित सोडण्यात येत असल्या तरी त्यामध्ये ७२ रातराणी गाड्यांचा समावेश आहे. एसटीबद्दल सुरक्षिततेबाबतच्या विश्वासार्हतेमुळेच प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.

ऑनलाइन आरक्षण

रत्नागिरी विभागातून लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांसह जादा गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण उपलब्ध आहे. ऑनलाइन आरक्षणाच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. येण्याबरोबर जातानाच्या प्रवासाचेही आरक्षण एकाचवेळी उपलब्ध होत आहे. रंगपंचमीपर्यंत शिमगोत्सव साजरा होत असल्याने गाड्यांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.

Web Title: Holi is full of ST bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.