मेड इन पाकिस्तानची खेडमध्ये होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 11:08 PM2019-02-28T23:08:01+5:302019-02-28T23:09:46+5:30
शहरात मनसेतर्फे पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक पातळीवर धडा
खेड : शहरात मनसेतर्फे पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाऱ्या खाद्यपदार्थांची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला आर्थिक पातळीवर धडा शिकवण्यासाठी मेड इन पाकिस्तान असलेल्या वस्तूंची मनसे कार्यकर्त्यांनी होळी केली.
पाकिस्तानमधून देशात विविध प्रकारचे मसाले आयात करण्यात येतात. या मसाल्यांना विशेषत: बिर्याणी मसाल्यांना ग्राहकवर्गातून मोठी मागणी आहे.शहरातील मोठी दुकाने, विविध बाजार, मिनी मॉल येथे ही उत्पादने विकली जातात. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी शहरातील दुकानदारांची भेट घेऊन पाकिस्तानी खाद्यपदार्थांची विक्री बंद करावी, असे आवाहन केले.
पाकिस्तानसारख्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणाºया राष्ट्राला आर्थिक पातळीवर धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानमध्ये उत्पादित होणाºया सर्वच वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी यावेळी केले. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेवक भूषण चिखले, गटनेते अजय माने, मिलिंद नांदगावकर, विश्वास मुधोळे, नंदू साळवी, प्रसाद शेट्ये, विवेक बनकर, बाबू नांदगावकर, अभिजीत कानडे, शैलेश धारिया, पुष्पेन दिवटे, सिध्देश साळवी, नईम चौगुले, पंकज आखडमल, दादू नांदगावकर, बुरान टांके, दानिश बागवान, प्रथमेश कानडे तसेच व्यापारी उपस्थित होते.