मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानला बुधवारपासून होणार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:17+5:302021-04-13T04:30:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दि. १४ एप्रिलपासून प्रारंभ होणार ...

The holy month of Ramadan for Muslims will start from Wednesday | मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानला बुधवारपासून होणार प्रारंभ

मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजानला बुधवारपासून होणार प्रारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यास बुधवार, दि. १४ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मंगळवारी चंद्रदर्शनानंतर तरावीह नमाज अदा केला जाणार आहे. लॉकडाऊन कालावधीतील शासकीय आदेशाचे पालन मात्र करण्यात येणार आहे.

मंगळवारी चंद्रदर्शनानंतर बुधवारपासून रमजान सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुबारकचे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव सोशल मीडियावर सुरू झाला आहे. आखाती प्रदेशात आज, मंगळवारपासून रमजान सुरू होणार आहे. बुधवारपासून भारतात रमजानला प्रारंभ होणार असून, सर्व मुस्लिम भाविक पहाटे सहेरी करून रोजे ठेवणार आहेत.

संपूर्ण रमजान मासामध्ये भाविक रोजे ठेवत असल्याने सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा थेंबही ग्रहण केला जात नाही. रोजे ठेवत असतानाच भाविक कुराण पठण व नमाज पठणही सुरू ठेवतात. एकूणच संपूर्ण महिनाभर मुस्लिम मोहल्यामध्ये धार्मिक वातावरण असते. तरावीह नमाजमध्ये कुराण पठण केले जात असल्यामुळे मशिदीमध्ये विशेष मौलवीची नियुक्ती करण्यात येते. मात्र, सोशल डिस्टन्सिंग व शासनाच्या आदेशाचे पालन करून मौलवी वगळता अन्य भाविकांना आपापल्या घरातच नमाज अदा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

दिवसभर अन्नपाणी वर्ज्य करण्यात येत असल्यामुळे सहरीसाठी हलकासा आहार घेण्यात येतो. इफ्तारसाठी फळांचे व खजुराचे सेवन केले जात असल्यामुळे खजूर, फळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय काळा खजूर, सिडलेस खजूर, विदेशी खजूर बाजारात उपलब्ध आहे. ग्राहकांकडून फळे व खजूर आवर्जून खरेदी करण्यात येत आहे. रमजानमध्ये पावाचाही खप सर्वाधिक होताे.

Web Title: The holy month of Ramadan for Muslims will start from Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.