लांजा पंचायत समितीतर्फे काेविड याेध्द्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:22+5:302021-04-06T04:30:22+5:30

लांजा तालुक्यातील काेविड याेध्द्यांना आमदार राजन साळवी यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क लांजा : लांजा ...

Honor of Kavid Yadavs by Lanja Panchayat Samiti | लांजा पंचायत समितीतर्फे काेविड याेध्द्यांचा सन्मान

लांजा पंचायत समितीतर्फे काेविड याेध्द्यांचा सन्मान

Next

लांजा तालुक्यातील काेविड याेध्द्यांना आमदार राजन साळवी यांच्याहस्ते प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क

लांजा : लांजा पंचायत समितीतर्फे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात कोविड योद्धा बनून कार्यरत असलेल्या लांजा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमधील यंत्रणेचा सत्कार करण्यात आला. तसेच सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये २३ ग्रामपंचायतींमधून निवडून आलेले सरपंच व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. हा सोहळा शहरातील सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला आमदार राजन साळवी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमधील सर्व सरपंच, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आरोग्यसेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका या सर्वांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच २३ ग्रामपंचायतींमधील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, जिल्हा परिषद शिक्षण सभापती चंद्रकांत मणचेकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, उपसभापती दीपाली दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी सभापती लीला घडशी, गटविकास अधिकारी यशवंत भांड, सहायक गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा परिषद सदस्य पूजा नामे, पूजा आंबोलकर, पंचायत समिती सदस्य श्रीकांत कांबळे, युगंधरा हांदे, संजय नवाथे, तालुका सरपंच संघटना अध्यक्ष संजय पाटोळे, युवा सेना उपतालुका युवाधिकारी प्रसाद माने आदींनी मेहनत घेतली.

Web Title: Honor of Kavid Yadavs by Lanja Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.