पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:33 AM2021-09-25T04:33:32+5:302021-09-25T04:33:32+5:30

चिपळूण : महाप्रलयकारी पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान- मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. ...

Honoring those who have become angels for the flood victims | पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्यांचा सन्मान

पूरग्रस्तांसाठी देवदूत ठरलेल्यांचा सन्मान

Next

चिपळूण : महाप्रलयकारी पुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान- मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अशावेळी लोकांच्या मदतीला परमेश्वररूपी हात पुढे आले. या प्रसंगात कोणी पाण्यात उतरून लोकांचे प्राण वाचवले, तर कोणी अन्नधान्य वाटप, कपडे, भांडी वाटप केले. कोणी रोख स्वरूपात मदत केली, अशा दानशूर आणि सेवाभावी वृत्तीच्या लोकांचा खेड येथील रिलीफ फाउंडेशनतर्फे चिपळूणमधील वालोपे येथे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सत्कार सोहळ्यात रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष सिकंदर जसनाईक म्हणाले की, सामाजिक कार्य करताना विशिष्ट आणि ठराविक मर्यादा न ठेवता रिलीफ फाउंडेशन जेव्हा काम करते, तेव्हा समोरच्या व्यक्तीची जात, पात, धर्म हे न विचारता ज्या सहकार्याच्या भावनेतून काम करीत आहे. भविष्यात याहून अधिक जोमाने फाउंडेशनच्या माध्यमातून सेवाकार्य होईल. तसेच सर्वसामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी रिलीफ फाउंडेशन सदैव राहील, असेही स्पष्ट केले.

रिलीफ फाउंडेशनच्या माध्यमातून कतार येथील उद्योजक अजिम धनसे, सिकंदर जसनाईक, खालिद चोगले, हनिफ घनसार मदत कार्य करीत आहेत. त्यांनी केलेला सत्कार म्हणजे परमेश्वराच्या दूतांचाच केलेला सत्कार आहे, असे प्रतिपादन सुबाई जमियत अहले हदीसचे अध्यक्ष शेख अब्दुलस्लाम सलकी यांनी केले. यावेळी चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम, रिलीफ फाउंडेशनचे प्रमुख खेडचे माजी सभापती सिकंदर जसनाईक, चिपळूण नगर परिषदेचे आरोग्य सभापती शशिकांत मोदी, रामदास राणे, नगरसेवक करामत मिठागरी, माजी नगरसेविका रिहाना बिजले, अनपूर मदरसा सिंधुदुर्गचे नाझीम मुकादम, मौलाना अब्दुल सलाम, मकसूद सैन्, मौलाना उमर, यासीन दळवी, रामदास राणे, जमी जमातचे आरिफ मुल्लाजी, दाऊद कादिरी, अता उल्ला तिसेकर, चिपळूण तालुका मुस्लीम समाज अध्यक्ष सलीम कास्कर उपस्थित होते.

Web Title: Honoring those who have become angels for the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.