धामणवणे ग्रामपंचायतीत विधवा महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:34 AM2021-09-21T04:34:39+5:302021-09-21T04:34:39+5:30
अडरे : धामणवणे ग्रामपंचायतीच्या ४५ वर्षांच्या इतिहास पहिल्यांदाच सामाजिक बांधिलकीतून विधवा निराधार महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना गृहोपयोगी ...
अडरे : धामणवणे ग्रामपंचायतीच्या ४५ वर्षांच्या इतिहास पहिल्यांदाच सामाजिक बांधिलकीतून विधवा निराधार महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना गृहोपयोगी वस्तू देण्यात आल्या. सरपंच सुनील सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम करण्यात आला.
माजी सरपंच संभाजी जाधव यांच्या हस्ते यावेळी ३३ विधवांचा सत्कार करण्यात आला. १०वी, १२वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा वही-पेन देऊन विशेष गौरव करण्यात आला. याबरोबरच साहिल संदीप उदेग यांनी आपल्या कला-कौशल्यातून नांगरणी मशीनची प्रतिकृती तर राज राजेंद्र पवार यांनी हवा भरण्याच्या मशीनची प्रतिकृती बनवल्याने, त्यांचा रोख रक्कम ५०० रुपये देऊन सन्मान करण्यात आला. पूर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यभारात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी सरपंच संभाजी जाधव, तुकाराम जाधव, विनायक शेंबेकर, जयराम शेंबेकर, बाळा उदेग, यशवंत सावंत, दत्ताराम उंडरे याचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच विजयालक्ष्मी वरेकर, अंजू उंडरे, रिया सावंत, पूजा लाड, जयश्री लाड, नितिन शिगवण, रमेश घडशी, हभप पंडू बुवा पिटले, माजी सरपंच विश्वास वाजे, नंदकुमार शेंबेकर, सुरेश लाड, संतोष उदेग, परशुराम शिगवण, अरविंद शिगवण, राजू मोंघे, सतीश जोशी, माधवी जोशी, काशीराम शिगवण, हरी जाडे, विजय उंडरे, नितिन जाधव, अशोक पवार, शक्ती जाधव, संजय जाधव, सदाशिव जाधव, प्रकाश कांबळी, संतोष वरेकर, अनिल उंडरे, बंड्या बेंडके, अशोक उदेग, सुमेध कदम उपस्थित होते.