रत्नागिरीतील हॉटेल रत्नसागर प्रशासनाच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 09:17 PM2021-02-02T21:17:47+5:302021-02-02T21:19:13+5:30
Hotel Ratnagiri- रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीनजिकच्या रत्नसागर हॉटेलची मुदत संपल्याने ही जागा जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. ही जागा एम.टी.डी.सी.ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसीत करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार एम.टी.डी.सी.च्या माध्यमातून रत्नसागर हॉटेलला ही जागा भाडेकरारावर देण्यात आली होती. मात्र, ही ३० वर्षांची मुदत संपल्याने आता जिल्हा प्रशासनाने ही जागा ताब्यात घेतली आहे.
रत्नागिरी शहरानजीकच्या बहुचर्चित मिऱ्या धूप संरक्षक बंधाऱ्यासाठी १९० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून बंधारा आणि ब्रेक वॉटर अशा दोन टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी.आर.एस. या कंपनीला हे काम देण्यात आले आहे. बंधाऱ्यासाठी ११० कोटी मंजूर झाल्याने लवकरात लवकर हे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.
गेल्या अनेक वर्षापासून मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचा विषय ऐरणीवर आलेला आहे. मिऱ्या येथील धूपप्रतिबंधक बंधारा वाहून गेल्याने दरवर्षीच्या पावसाळ्यात मिऱ्या पंधरामाड येथील मानवी वस्तीत समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसते. त्यामुळे येथील नागरिकांना भरतीच्या वेळी जीव मुठीत घेऊन राहावे लागते. या बंधाऱ्याचे काम कायमस्वरूपी व्हावे, यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक आंदोलन करत आहेत.
या बंधाऱ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दीड कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. आता पुन्हा या कायम बंधाऱ्याच्या कामासाठी राज्य शासनाकडून १९० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या सी.डब्ल्यू.पी. आर.एस. या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात बंधाऱ्याचे काम होणार आहे. त्यासाठी ११० कोटींच्या निधीला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला.