नियम डावलून चिपळूणचा विकास होणार कसा : विजय कदम

By admin | Published: April 18, 2017 01:47 PM2017-04-18T13:47:39+5:302017-04-18T13:47:39+5:30

शिवसेना स्टाईलने वेळेचे महत्त्व पटवून देण्याची वेळ

How to develop Chiplun under rule: Vijay step | नियम डावलून चिपळूणचा विकास होणार कसा : विजय कदम

नियम डावलून चिपळूणचा विकास होणार कसा : विजय कदम

Next

आॅनलाईन लोकमत

चिपळूण , दि. १८ : : चुकीच्या पद्धतीने विकास कामे मार्गी लावण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न पूर्ण चुकीचा असून त्याला शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेला विरोध हा योग्य आहे. कामाची वर्कआॅर्डर ठेकेदाराला दिल्यानंतरही जर नगराध्यक्षा सुरेखा खेराडे जाणीवपूर्वक कामाच्या भूमिपूजनास उशीर करत असतील तर ही बाब विकासाला हानीकारण आहे. जी भुयारी गटार योजना अस्तित्वात येणे शक्य नाही. त्यासाठी वायफळ प्रयत्न करुन प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच मुख्याधिकारी हे लेटलतिफ झाले असून त्यांना शिवसेना स्टाईलने वेळेचे महत्त्व पटवून देण्याची वेळ आली असल्याची टिका जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राज्य घटनेने लोकशाही पद्धतीचा वापर सुरु केला. सर्वसामान्य नागरिकांवर कोणी अन्याय करु नये व अन्याय कोणी केला तर त्याला कायद्याच्या माध्यमातून शासन होणे गरजेचे आहे. चिपळूण शहरातील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कारभाराबाबत संपर्क प्रमुख कदम यांनी माहिती घेतली.

यावेळी उपस्थित नगरसेवकांनी कायदा डावलून विद्यमान नगराध्यक्षा खेराडे, मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी कसा कारभार सुरु ठेवला आहे याची माहिती दिली. यावेळी भुयारी गटार योजना, ८० लाख रुपयांचे बाजार पुलाचे बोगस बिल, अडीच कोटीचे वादग्रस्त रस्ते, एलईडी योजना, ८० लाख रुपयांची डजबीन खरेदी, भुयारी गटारासंदर्भात नागरिकांची होणारी दिशाभूल, वर्कआॅर्डर देवूनही काम करण्यास नगराध्यक्षांकडून होणारा जाणीवपूर्वक विलंब, शासनाचे विविध नियम धाब्यावर बसून ठेकेदारांची काढण्यात येणारी बिले या संदर्भात चर्चा झाली.

पेठमापातील कामाचे आदेश दिल्यानंतरही नगराध्यक्षांना वेळ नसल्यामुळे विकास काम सुरु होण्यास विलंब होणे हे अयोग्य आहे. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. मुख्याधिकारी पाटील यांनी वेळेचे बंधन पाळणे गरजेचे असून त्यांच्याकडे जर नागरिकांना देण्यासाठी जर वेळ नसेल तर त्यांना वेळेच महत्त्व पटवून देण्याची ताकद शिवसेनेकडे आहे असे कदम यांनी सांगितले.


यावेळी शहरप्रमुख राजू देवळेकर, गटनेते शशिकांत मोदी, उमेश सकपाळ, नगरसेवक मोहन मिरगल, मनोज शिंदे, विकी नरळकर, नगरसेविका जयश्री चितळे, संजीवनी घेवडेकर, स्वाती दांडेकर, सुषमा कासेकर, सई चितळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: How to develop Chiplun under rule: Vijay step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.