शिक्षण कसे कळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:51+5:302021-04-14T04:28:51+5:30

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे ...

How to learn education? | शिक्षण कसे कळणार?

शिक्षण कसे कळणार?

Next

आपण शाळेत जायला लागल्यापासून अगदी पहिल्या वर्षापासून परीक्षा सुरू होतात, त्या याच कारणाने की आपण वर्षभर केलेल्या शैक्षणिक कामकाजाचे मूल्यमापन व्हावे आणि आपण पुढच्या वर्गात बसण्यासाठी पात्र आहोत की नाही, जे वर्षभर शिक्षण मनापासून घेतात, नियमित अभ्यास करतात, तेच या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होतात. अन्यथा अभ्यासाबाबत टाळाटाळ करणारे अनुत्तीर्ण होवून त्याच वर्गात बसतात. म्हणजेच परीक्षा या प्रत्येक वर्गासाठी पात्र - अपात्र निकषाच्या मर्यादा आहेत. म्हणूनच दरवर्षी या परीक्षा होणे तेवढेच गरजेचे आहे.

मात्र, गेल्या वर्षापासून जागतिक स्तरावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रावरही त्याचे अनिष्ट सावट आहे. म्हणूनच गेल्या वर्षापासून केजी ते अगदी पीजीपर्यंतचे विद्यार्थी वर्षभर घरात आहेत. या कालावधीत शाळा - महाविद्यालयांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले; मात्र प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययनक्षमता सारखी असते असे नाही, त्यामुळे प्रत्यक्ष शिकवूनही ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास कळणे अवघड होते, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गातूनही कळणे अवघड झालेले आहे. त्यामुळे या वर्षभरात विद्यार्थ्यांचा प्रत्यक्षात अभ्यास किती झाला, हे प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे त्याचे मूल्यमापन परीक्षेच्या माध्यमातूनच होणे शक्य आहे.

मात्र, कोरोनाच्या सद्यस्थितीत मुलांच्या एकत्रित परीक्षा घेणे हे तितकेच अवघड आहे; मात्र पहिल्या वर्षीचे मूल्यमापन न होताच मुलांना पुढच्या वर्गात ढकलणे, यातही तेवढाच धोका आहे, हेही सरकारने लक्षात घ्यायला हवे. परीक्षा रद्द करण्याऐवजी त्याबाबत कोणता निर्णय घ्यायला हवा, याबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

परीक्षांवर त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने पुढील निर्णय अवलंबून असतात. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुलांचा त्या इयत्तेचा अभ्यास नियमित वर्गाच्या तुलनेने परिपूर्ण झालेला नाही. त्यामुळे ही मुले आता पुढच्या वर्गात बसल्यास त्यांचा मागील अभ्यास झाला किंवा नाही, हे कळणे फार अवघड आहे. त्यामुळे किमान या मुलांच्या चाचपणीसाठी त्यांच्या परीक्षांच्या बाबतीतही योग्य तो मध्य साधून उचित निर्णय होणे गरजेचे होते. जी मुले लहान आहेत, त्यांच्या परीक्षा इतक्या महत्त्वपूर्ण नसल्या तरी वरच्या वर्गांसाठी विशेषत: नववीसाठी परीक्षा महत्त्वाच्याच आहेत. कारण नववी इयत्ता हा दहावीचा पाया समजला जातो. तो परिपूर्ण हवा. मुलांना शिक्षणाचे महत्त्व परीक्षांमुळेच कळते. म्हणूनच परीक्षांबाबत योग्य निर्णय हवा.

Web Title: How to learn education?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.