चक्रीवादळाचा थ्री एम पेपर मिल कंपनीलाही फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:32 AM2021-05-19T04:32:24+5:302021-05-19T04:32:24+5:30
अडरे : शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये कंपनीचे १६ ...
अडरे : शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीला चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये कंपनीचे १६ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याची माहिती व्यवस्थापक स्वामी यांनी दिली.
ताउते चक्रीवादळाचा चिपळूणला माेठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रविवारी व सोमवारी अवकाळी पावसाने तालुक्याला चांगलेच झोडपले. वादळी वाऱ्यासह पाऊस पडत होता. यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागात झाडे उन्मळून पडून वीजपुरवठा खंडित झाला, तर काही ठिकाणी घरे, गोठे व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. यामध्ये खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर कंपनीलाही चक्रीवादळाचा फटका बसला आहे. कंपनीच्या शेडचे एसी शीट, जीआय शीट्स खराब झाले आहेत, तसेच कटर मशीन व क्रेन डीएसएल बुश बार सीस्टिम खराब झाली आहे. ड्राइव्ह, मोटर्स आणि बॉयलर फर्नेस, ईएसपी आणि मुख्य स्टीम लाइन इन्सुलेशनही नादुरुस्त झाले आहे. कंपनीचे सुमारे १६ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
-------------------------
ताउते चक्रीवादळामुळे चिपळूण तालुक्यातील थ्री मेल पेपर मिल कंपनीच्या छतावरील पत्रे उडून गेले आहेत.