कांदोशी धनगरवाडीत चक्रीवादळाने घरांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:24+5:302021-04-22T04:32:24+5:30
खेड : तालुक्यातील कांदोशी धनगरवाडी येथे झालेल्या चक्रीवादळात अनेक घरांचे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणेने तातडीने येथे मदत द्यावी, ...
खेड : तालुक्यातील कांदोशी धनगरवाडी येथे झालेल्या चक्रीवादळात अनेक घरांचे नुकसान झाले असून, शासकीय यंत्रणेने तातडीने येथे मदत द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेले काही दिवस रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस व चक्रीवादळे होत आहेत. दि. १५ रोजी खेड तालुक्यातील कांदोशी धनगरवाडी येथे चक्रीवादळ होऊन कोंडीराम अर्जुन बर्गे व अन्य ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले आहे. अनेक गरीब कुटुंबांना आता मोडक्या छपराखाली राहावे लागत आहे. मागासवर्गीय गरीब कुटुंबांना तातडीची मदत करून आधार देण्याची अत्यंत गरज आहे. कांदोशी धनगरवाडीतील चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना भरपाई मिळवून देण्यास सहकार्य करावे, अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे.