Ratnagiri: प्रियकराच्या साथीने पतीचा खून, पोलिसांनी चोवीस तासांत दोन्ही संशयितांना केले गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 12:25 PM2024-06-06T12:25:22+5:302024-06-06T12:26:05+5:30

गुहागर : तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत गणेश माने याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून ...

Husband killed by boyfriend, Police nabbed both suspects within 24 hours | Ratnagiri: प्रियकराच्या साथीने पतीचा खून, पोलिसांनी चोवीस तासांत दोन्ही संशयितांना केले गजाआड

Ratnagiri: प्रियकराच्या साथीने पतीचा खून, पोलिसांनी चोवीस तासांत दोन्ही संशयितांना केले गजाआड

गुहागर : तालुक्यातील देवघर येथील नदीकिनारी कुजलेल्या अवस्थेत गणेश माने याचा मृतदेह सापडला. त्याची पत्नी व तिच्या प्रियकराने मिळून हा खून केला असल्याचे पोलिस तपासात पुढे आले असून, गुहागरपोलिसांनी जयश्री माने (वय ३७) व प्रदीप सीताराम कदम (४२, रा. खेड) या दोघांनाही बुधवारी पहाटे अटक केली आहे. या दोघांनी गणेश माने याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील गणेश शिवराम माने याची सासूरवाडी चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे गोपाळवाडी येथील आहे. १ जून रोजी गणेश माने याचा मृतदेह देवघर येथील नदीकिनारी आढळला होता. तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

शवविच्छेदन अहवालानुसार, डोक्याच्या पाठीमागील व पुढील भागावर कवटीला मार बसल्याने गणेशचा मृत्यू झाला आहे. यामुळे हा घातपातच असल्याचे गुहागर पोलिसांनी हेरले. गेले तीन दिवस या प्रकरणी गुहागर पोलिसांनी तपासाची सूत्रे अधिक वेगाने फिरवली आणि अखेर बुधवारी गणेशची पत्नी व तिचा प्रियकर या दोघांना गुहागर पोलिसांनी अटक केली.

गणेश मानेच्या पत्नीचा लॉकडाऊन काळात खेड तालुक्यातील आंबडस गवळवाडी येथील वडापचालक प्रदीप कदम याच्याशी संपर्क आला. त्याचा आपल्या पत्नीशी घटस्फोट झाला आहे. त्याचे व जयश्री मानेचे सूत जुळले. गेली चार वर्षे सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणाचा सात ते आठ महिन्यांपूर्वी गणेश माने याला सुगावा लागला. यामुळे गणेशचे पत्नीशी खटके उडू लागले. गणेश तिला मारहाणही करत असे. त्यामुळे चार महिन्यांपूर्वी ती आपल्या माहेरी जाऊन राहू लागली. 

मात्र गणेश माने हा त्रास देत असल्याने अखेर त्याचा कायमचा काटा काढण्याचे तिने व तिच्या प्रियकराने ठरवले. यासाठी १७ एप्रिल रोजी तिने गणेशला मार्गताम्हाणे येथे बोलावून घेतले. सायंकाळी ६ च्या सुमारास देवघर येथील नदीकिनारी बोलण्यासाठी घेऊन गेली. तेथे तिने व प्रदीप कदम याने दगडाने डोक्यावर मारहाण करत गणेशचा खून केला आणि मृतदेह नदीच्या पात्रात टाकून दिला, असा घटनाक्रम या खुनामध्ये समोर येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Husband killed by boyfriend, Police nabbed both suspects within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.