सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 01:24 AM2021-04-29T01:24:30+5:302021-04-29T22:13:09+5:30

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या.

Husband killed, wife seriously injured in bizarre accident near Rajapur | सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

सांगलीतील भाजी विक्रेत्याचा राजापूर येथे अपघाती मृत्यू

Next

राजापूर : रस्त्याच्या बाजूला भाजी विक्रीसाठी बसलेल्या भाजी विक्रेत्याच्या अंगावर कंटेनरचा फाळका पडून झालेल्या अपघातात गाडीचा चालक निखिल पोपट साळुंखे (वय ३२, रा. आष्टा, सांगली) हे जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ (रा. सांगली) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर गंगा तिठा येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची माहिती उज्ज्वला भारत सरगर (२५) यांनी पाेलिसांना दिली.

राजापूर गंगा तिठा येथे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील निखिल साळुंखे भाजी विक्रीसाठी बसले हाेते, तर नकुशा मासाळ व उज्ज्वला सरगर तेथेच जेवण करत बसल्या हाेत्या. याचदरम्यान महामार्गावर कंटेनर (एचआर ५५, वाय ६१०८) हा गोव्याकडून मुंबईकडे चालला होता. हा कंटेनर कादीर कशौत अली (३६, रा. तिलजा, ता. समरीयाना, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) हा चालवीत होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटला आणि उन्हाळे येथील अवघड वळणावर कंटेनरला अपघात झाला. त्यावेळी कंटेनरचा फाळका तुटला व भाजी विक्रीसाठी बसलेल्या निखिल साळुंखे यांच्या अंगावर जाऊन पडला. अचानक घडलेल्या प्रकाराने त्यांना पळण्याचीही संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या नकुशा प्रकाश मासाळ या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
अपघातानंतर पाेलिसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी निखिल साळुंखे हे मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

अपघाताला कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचालक कादीर शौकत अली याच्यावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक एस. एस. वेंगुर्लेकर अधिक तपास करीत आहेत.

अनेक वर्षे भाजी विक्री

नकुशा या गेली अनेक वर्षे सांगली येथून स्वतः बोलेरो पिकअप्‌मध्ये भाजी भरून घेऊन कोकणात येऊन त्याची विक्री करतात. त्या स्वतः गाडी चालवितात. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत कधीही अपघात केलेला नाही. मात्र, या विचित्र अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना पुढील उपचारार्थ कोल्हापूरकडे हलविण्तया आले आहे. कंटेनर चालक कादीर शौकत अली याला रत्नागिरीमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.

दाेन दिवसांपूर्वी राजापुरात
सांगलीतील हे कुटुंब भाजी विक्रीसाठी काेकणात येते. राजापूर येथे दाेनच दिवसांपूर्वी ते भाजी विक्रीसाठी आले हाेते. गंगा तिठा येथे भाजीचा स्टाॅल ते मांडतात. मात्र, रस्त्यावरून जाणारा कंटेनर त्यांच्यासाठी काळ बनून आला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली.

Web Title: Husband killed, wife seriously injured in bizarre accident near Rajapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.