हुश्श। सारेच पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:27 AM2021-04-05T04:27:31+5:302021-04-05T04:27:31+5:30

रत्नागिरी : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक सत्र पूर्णत: कोलमडलेली होती. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने पहिली ...

Hush. All the passes | हुश्श। सारेच पास

हुश्श। सारेच पास

Next

रत्नागिरी : कोरोनामुळे यावर्षी शैक्षणिक सत्र पूर्णत: कोलमडलेली होती. त्यातच पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासनाने पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील खासगी, शासकीय तसेच विविध माध्यमांच्या एकूण ३२०२ शाळांमधील २ लाख ४२ हजार ३०१ विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

वास्तविक गतवर्षी मार्चपासून शाळा बंद झाल्या. वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. मात्र, कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे शाळांचे अध्यापन ऑनलाइन सुरू करण्यात आले. दीपावलीपर्यंत पहिली ते बारावीपर्यंत सर्वांचेच अध्यापन ऑनलाइन पद्धतीने सुरू होते. मात्र, नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग जानेवारीपासून सुरू झाले. पालकांनी अंदाज घेत मुलांना शाळेत पाठविण्यास सुरुवात केली. शाळांनाही मुलांच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली होती.

मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. काही शाळांमध्ये वार्षिक परीक्षा सुरू असून अंतिम टप्प्यात आहेत. काही शाळांनी नववीच्या परीक्षा संपवून दहावीच्या जादा वर्गाची तयारी सुरू केली आहे. त्यातच शासनाने शनिवारी पहिली ते आठवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी पास करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाचे अद्याप ऑनलाइन अध्यापन सुरू होते. ग्रामीण भागातील कित्येक पालकांकडे मोबाइल नसल्याने मुलांचे नुकसान होत होते. पहिली ते आठवीपर्यंत पास करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे काही पालकांमधून स्वागत करण्यात येत आहे, तर काही पालक मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याबद्दल चिंतेत आहेत.

कोट

गतवर्षी परीक्षा न घेताच पास करण्यात आले. यावर्षी काही शाळांतून परीक्षा सुरू झाली आहे, तर काही शाळांमध्ये परीक्षा सुरू व्हायची आहे. या निर्णयामुळे मुलांचे नुकसान होत आहे. त्यापेक्षा मुलांना त्याच वर्गात बसवले असते तरी चालले असते.

-कल्पना चितळे, पालक

कोट

पहिली ते आठवीच्या वर्गासाठी शासनाने पासचा निर्णय घेतला असला तरी यावर्षी ऑनलाइन अभ्यासक्रमामुळे मुलांना ऑनलाइन अध्यापन पद्धतीचा किती लाभ झाला, याची खात्री पटवून घेण्यासाठी फायदा झाला असता. प्रत्यक्ष वर्गात शिकत असताना, गणितासारख्या विषयांचे आकलन होण्यास कमी पडतात. ऑनलाइनमुळे मुलांच्या भविष्यातील अभ्यासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- शकील डिंगणकर, पालक

कोट

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत शासनाने ‘पास’चा निर्णय योग्य आहे. शासन निर्णयाचे पालन करण्यात येणार आहे. आतापर्यंत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन, तर पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग ऑफलाइन सुरू होते. मात्र, ज्या गावात मोबाइलची रेंज नाही, त्या गावात पालकांच्या परवानगीने शिक्षक जाऊन मार्गदर्शन करीत होते. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर शिक्षकांना मुलांच्या प्रगतीसाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.

जिल्ह्यातील शाळा - ३,२०२

विद्यार्थिसंख्या २,४२,३०१

चौकट

तालुकानिहाय शाळा व विद्यार्थिसंख्या

तालुका शाळा विद्यार्थी

मंडणगड १८६ ८८२५

दापोली ३५५ २५२७३

खेड ४४० २८६७३

चिपळूण ४६८ ४६९४१

गुहागर २३७ १६६६०

संगमेश्वर ४२८ २५०८२

रत्नागिरी ४३१ ५३६८९

लांजा २५१ १४९९२

राजापूर ४०६ ५३६८९

Web Title: Hush. All the passes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.