विकासाला माझा विरोध नाही : गीते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 01:04 AM2018-01-15T01:04:46+5:302018-01-15T01:08:13+5:30

I am not opposed to development: Geeta | विकासाला माझा विरोध नाही : गीते

विकासाला माझा विरोध नाही : गीते

Next


गुहागर : केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला माझा कधी विरोध नव्हता व यापुढेही राहणार नाही, असे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी रविवारी आपल्या गुहागर दौºयाप्रसंगी स्पष्टपणे सांगितले. नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत कुणाच्याही वक्तव्यावर भाष्य करण्यापेक्षा प्रत्येकाने आपापली भूमिका पार पाडली तर कोकणाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला.
नियोजित रिफायनरी प्रकल्प परिसरात एकाही शासकीय अधिकाºयाला पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.
रिफायनरी प्रकल्पाबाबत एकूणच भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप केला जातो. एका बाजूला खासदार विनायक राऊत नाणार प्रकल्पाला विरोध करीत आहेत, तर केंद्रीय मंत्री प्रकल्पाचे समर्थन करीत आहे. याबाबत बोलताना गीते म्हणाले की, या प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. त्या परिसरातील जनतेचा विरोध आहे म्हणून शिवसेनेचा याला विरोध आहे. व्यक्तिगत केंद्रीय मंत्री म्हणून विकासाला कधी विरोध नव्हता व भविष्यातही राहणार नाही, असे स्पष्ट केले.
विरोधाबाबत तोडगा काढू
गुहागर - विजापूर महामार्गाच्या कामाला विरोध केला जात आहे. याबाबत बोलताना आपण सामंजस्याने तोडगा काढू, असे त्यांनी सांगितले.
या चौपदरीकरण कामाचा प्रारंभ लवकरच होईल व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आपणही उपस्थित राहू, असे अनंत गीते यांनी स्पष्ट केले.

Web Title: I am not opposed to development: Geeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.