संसर्ग रोखण्यासाठी आदर्शवत नियमावली तयार करणार : साळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:43+5:302021-04-13T04:30:43+5:30
रत्नागिरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन काळाची गरज आहे. शासनाकडून येत्या काही दिवसांत कडक लॉकडाऊन ...
रत्नागिरी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक लॉकडाऊन काळाची गरज आहे. शासनाकडून येत्या काही दिवसांत कडक लॉकडाऊन घोषित केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल, अशी नियमावली व यंत्रणा रत्नागिरी नगर परिषद व्यापाऱ्यांच्या सहकार्याने तयार करणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी केले.
अत्यावश्यक सेवेमध्ये दूध घरोघरी पोहोचविण्याची जबाबदारी नगर परिषद घेईल, असे आश्वासन नगराध्यक्ष साळवी यांनी दिले. व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांची सोमवारी नगर परिषदेमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी विविध समस्या नगराध्यक्षांसमोर विशद केल्या. नगराध्यक्षांनीही व्यापाऱ्यांना सहकार्य केले.
यावेळी रत्नागिरी व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई, शहराध्यक्ष गणेश भिंगार्डे, माजी अध्यक्ष उदय पेठे, उपाध्यक्ष राजकुमार जैन, हेमंत वणजू, अमोल डोंगरे, नगरसेवक निमेश नायर यावेळी उपस्थित होते.