राजेश नरवणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:36 AM2021-08-13T04:36:19+5:302021-08-13T04:36:19+5:30
दापोली : महर्षी कर्वे शिक्षण संस्था मुरूड संचलित एन. के. वराडकर हायस्कूलचे उपशिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना संस्थेने ‘आदर्श ...
दापोली : महर्षी कर्वे शिक्षण संस्था मुरूड संचलित एन. के. वराडकर हायस्कूलचे उपशिक्षक राजेश बाळकृष्ण नरवणकर यांना संस्थेने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविले.
आपल्याच गावातील ज्या शाळेत शिकलो, त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी राजेश नरवणकर यांना २००६ मध्ये एन. के. वराडकर या प्रशालेने दिली. त्यामुळेच राजेश नरवणकर यांनी २००८ पासून दहावीचा निकाल १०० टक्के लावण्यात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. संस्थेच्या अध्यक्षा सुहासिनी मोरे, सचिव संजय भावे, विश्वस्त रमेश तळवटकर, शालेय समिती अध्यक्ष विवेक भावे, नियामक मंडळ अध्यक्ष सुभाष साटले, नियामक मंडळ उपाध्यक्ष उल्हास वराडकर, इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा मिरवणकर यांनी केले.