दरपत्रकापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास करा तक्रार, व्हॉट्सॲप नंबर अन् नेमकं दर जाणून घ्या
By शोभना कांबळे | Published: September 5, 2023 05:50 PM2023-09-05T17:50:18+5:302023-09-05T17:50:46+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराने या दराच्या ...
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने दरपत्रक ठरवून दिले आहे. कोणत्याही खासगी बस वाहतूकदाराने या दराच्या 50 टक्के अधिक (दीडपट) आकारणी करण्यास परवानगी आहे. या दराच्या दीडपटापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास प्रवाशांनी ०२३५२-२२५४४४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर वाहन, वाहनाचा नोंदणी क्रमांक व भाडे आकारणी तिकीट यांच्या फोटोसह तक्रार नोंदवावी, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
प्रवासाचा मार्ग रत्नागिरी ते मुंबई अनुक्रमे– साधे ५२५ रुपये, शिवशाही (वातानुकुलित) ८१५ रुपये, शयनयान (विना वातानुकुलित) ७१० रुपये. रत्नागिरी ते ठाणे – ५०५ रुपये, ७५० रुपये, ६९० रुपये. रत्नागिरी ते बोरीवली - ५५० रुपये, ८१५ रुपये, ७५० रुपये. रत्नागिरी ते पुणे/पिंपरी – ४९० रुपये, ७२५ रुपये, ६६५ रुपये. चिपळूण ते मुंबई – ३९० रुपये, ५८५ रुपये, ५३५ रुपये. चिपळूण ते पुणे – ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते मुंबई – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. दापोली ते ठाणे - ३६० रुपये, ५३० रुपये, ४८५ रुपये. दापोली ते बोरोवली – ३७५ रुपये, ५५५ रुपये, ५१० रुपये. व दापोली ते पुणे/पिंपरी – ३५० रुपये, ५२० रुपये, ४७५ रुपये. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणने शेअर ए रिक्षा थांबे व दरपत्रक देखील ठरवून दिलेले आहेत.त्यानुसारच प्रवाशांनी भाडे द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.