प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास यशश्री नतमस्तक हाेते : सुहास भाेळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:30 AM2021-04-06T04:30:11+5:302021-04-06T04:30:11+5:30
रत्नागिरी : एखादी कलाकृती पूर्णत्वाला जाईपर्यंत किती अडचणी येऊ शकतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. परंतु प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास ...
रत्नागिरी : एखादी कलाकृती पूर्णत्वाला जाईपर्यंत किती अडचणी येऊ शकतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. परंतु प्रयत्नांची पराकाष्टा केल्यास यशश्री तुमच्यासमोर नतमस्तक होते, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भाेळे यांनी व्यक्त केले.
येथील ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे यांच्या लेखणीतून साकार झालेल्या पहिल्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा उद्योजक मरिनर कॅप्टन दिलीप भाटकर यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम् विश्वेश्वरैया सभागृहात पार पडला. कोविडच्या पार्श्वभूमीवर नियम पाळत केवळ २५ निमंत्रितांचाच सहभाग करण्यात आला होता. यावेळी मनाेगत व्यक्त करताना ते बाेलत हाेते.
सुहास भाेळेंच्या या मंथन कादंबरीला मधुमंगेश कणिक यांची प्रस्तावना आहे. त्याचे वाचन सूत्रसंचालिका अनुया बाम यांनी केले. कादंबरीचे आकर्षक मुखपृष्ठ श्रीकृष्ण पंडित यांनी तयार केले आहे, तर याची छपाई शेखर हातीसकर यांनी केली आहे. यावेळी श्रीकांत पाटील, श्रीकृष्ण पंडित, अनुया बाम, विनयराज उपरकर यांनीही मनाेगत व्यक्त केले.
कॅप्टन दिलीप भाटकर यांनी आपल्या भाषणात सुहास भोळेंच्या पहिल्या रंगमंचावरील एन्ट्रीची नवलकथा सांगितली. यावेळी दिलीप भाटकर यांनी समस्त दर्यावर्दीतर्फे सुहास भोळे यांचा सत्कार केला. आभार विनयराज उपरकर यांनी मानले.
या कार्यक्रमाला श्रीकांत पाटील, जयश्री आपटे, जिज्ञासा भोळे-जागुष्टे, अक्षता भोळे, लीलाधर भडकमकर, महेंद्र कदम, शुभम शिर्के, प्रकाश दळवी, अनिल दांडेकर, प्रदीप तेंडुलकर, श्रीनिवास जोशी उपस्थित होते.