गुहागर-वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:33+5:302021-08-20T04:35:33+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे याआधी अपघाताच्या ...

If the pits on Guhagar-Veldur road are not filled, we will plant trees | गुहागर-वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करू

गुहागर-वेलदूर मार्गावरील खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करू

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : गुहागर बाजारपेठ ते वेलदूर मार्गावर अनेक मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे याआधी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांची भेट घेऊन गणपतीपूर्वी मार्गावरील सर्व खड्डे बुजवा, अन्यथा खड्ड्यात वृक्षाराेपण करू, असा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला कल्पना देण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही या मार्गावरील खड्डे जैसे थे प्रमाणे असून, वाहनचालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. याबाबत गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपअभियंता निकम यांची भेट घेऊन गुहागर शहरातील वेलदूर-गुहागर रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल चर्चा केली. त्यावर त्यांनी लवकरात लवकर खड्डे भरले जातील, असे आश्वासन दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मंदार कचरेकर, श्रीधर बागकर, तुषार सुर्वे उपस्थित होते.

Web Title: If the pits on Guhagar-Veldur road are not filled, we will plant trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.