संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 04:04 PM2022-06-13T16:04:43+5:302022-06-13T17:22:23+5:30

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही

If there is morality then Uddhav Thackeray should resign from the post of Chief Minister says Union Minister Narayan Rane | संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

Next

कणकवली : महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी १४५ आमदार लागतात. मात्र, आता राज्य सरकारचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे लोकशाहीतील नातेसुद्धा त्यांनी धुळीला मिळवले आहे. त्यांचे सत्तेतील आठ-आठ, नऊ-नऊ आमदार फुटतात, याचा अर्थ त्यांच्यावर आता त्या आमदारांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नैतिकता असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाजूला व्हावे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी पडवे येथे रविवारी संवाद साधला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.

मंत्री नारायण राणे म्हणाले, राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन करण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वाचा विजय मिळविला आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्याच्या श्रमाचे फळ मिळाले. सर्व भाजप आमदारांनी निष्ठेचे दर्शन घडविले. पक्षाप्रति असलेली निष्ठा, श्रद्धा, प्रामाणिकपणा कसा असतो हे आमदार जगताप, आमदार टिळक यांनी आजारी असतानाही मतदान करून दाखवल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जी भाषा वापरली, ज्या भाषेत विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली. ती मुख्यमंत्रिपदाला शोभणारी नाही. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले, सावरकर, टिळक, महात्मा गांधी यांच्या राज्यात मुख्यमंत्री जी भाषा वापरतात ती संसदीय नाही. शरद पवार यांनी भाजपच्या विजयाने पराभवाचा धक्का बसला नाही, असे सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी माणसे जपली, आमदार सांभाळले, म्हणून विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.

यापुढे ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत

संजय राऊतांचे अभिनंदन करण्याच्या वृत्तीचे ते नाहीत. मात्र त्यांचे गुरु शरद पवार आहेत. त्यांची प्रतिक्रिया त्यांनी वाचावी. खासदार संजय राऊत हे. मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेले आहेत. त्यांना वाटते आपण मुख्यमंत्री. होणार. मात्र, असे कधीही होणार नाही. यापुढे १८ नाहीच तर ६ सुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. २०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही, असेही मंत्री राणे या वेळी म्हणाले.

Web Title: If there is morality then Uddhav Thackeray should resign from the post of Chief Minister says Union Minister Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.