सकारात्मक निर्णय न झाल्यास धान्य वितरण बंद करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:30 AM2021-05-01T04:30:26+5:302021-05-01T04:30:26+5:30

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या थंबने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी. ...

If there is no positive decision, we will stop the distribution of grain | सकारात्मक निर्णय न झाल्यास धान्य वितरण बंद करू

सकारात्मक निर्णय न झाल्यास धान्य वितरण बंद करू

Next

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत धान्य दुकानदारांना स्वतःच्या थंबने धान्य वाटप पॉस मशीनद्वारे करण्याची परवानगी मिळावी. रेशन दुकानदारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास धान्य वितरण १ मेपासून बंद ठेवले जाईल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला आहे.

कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रशासनासमोर कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. दुसरीकडे गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना परिस्थितीनंतर रेशनिंग दुकानदार संघटनेने काही मागण्या शासनाकडे केल्या होत्या. त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. यामध्ये जिल्ह्यातील रास्त धान्य दुकान मालक- चालक रॉकेल एजन्सी धारकांना विमा संरक्षण व्हावे, कोविड लस देण्यात यावी, याचबरोबर कोकण विभागीय वरिष्ठ उपायुक्तांकडून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना रेशन दुकानदारांसाठी हॅन्डग्लोव्हज्‌, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा होण्यासंदर्भात आदेश व्हायला पाहिजे होते, ते आदेश अद्याप दिलेले नाहीत. शासनाकडून पारदर्शकपणाची अपेक्षा ठेवली जाते. मात्र, कमिशन देण्याबाबत पारदर्शकता ठेवली जात नाही.

एकंदरीत धान्य दुकानदारांना मिळणारे धान्य विक्रीचे कमिशन वेळेत मिळावे, अशी मागणी कदम यांनी केली आहे. कमिशन वेळेत मिळत नसल्याने रेशन दुकानदारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्ह्यातील धान्य दुकानदारांना शासनाच्यावतीने देण्यात आलेली ई-पॉस मशीन मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त होत आहेत. मशीनच्या बॅटऱ्याही नादुरुस्त होत आहेत. वारंवार मागणी करूनही मशीन अथवा बॅटर्‍यांबाबत निर्णय झालेला नाही. एकंदरीत शासन-प्रशासनाने आमच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी केली.

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला संघटनेचे सचिव प्रकाश आग्रे, नितीन कांबळे, उपाध्यक्ष विकास चव्हाण, रत्नागिरी तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: If there is no positive decision, we will stop the distribution of grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.