सुधारित नळ योजनेचे

By admin | Published: October 2, 2016 11:19 PM2016-10-02T23:19:36+5:302016-10-02T23:19:36+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : जिल्हाध्यक्ष बाळ मानेंच्या प्रयत्नांना यश

Improved Taps Scheme | सुधारित नळ योजनेचे

सुधारित नळ योजनेचे

Next

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी
रत्नागिरी नगरपरिषदेसाठी बहुप्रतीक्षित सुधारीत नळपाणी योजनेचे घोडे अखेर गंगेत न्हाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या ६३ कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या या सुधारित नळपाणी योजनेतील ५०पेक्षा अधिक त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र तथा बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ही योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आचारसंहितेच्या पूर्वी कोणत्या मुहूर्तावर होणार, याबाबत रत्नागिरीकरांना उत्सुकता आहे.
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारी सर्वच वितरण व्यवस्था खराब झाली आहे. शीळ धरणावरील मुख्य जलवाहिनी गंजल्याने जागोजागी फाटली आहे. त्यामुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात आहे. १९६५ पासून कार्यरत पानवल धरणावरून आलेली जलवाहिनीही खराब झाली आहे. जलशुध्दिकरण प्रकल्पाची दुरुस्ती आवश्यक आहे. शहरातील घरा-घराकडे पाणी पोहोचविणाऱ्या अंतर्गत जलवाहिन्या गंजल्याने बाद झाल्या आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड बनले आहे. शीळ व पानवल धरणात मुबलक पाणी असूनही पाणी वितरण वाहिन्यांतील दोषामुळे शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा किवा पाणीच न येणे या समस्यांना दहा वर्षांपासून रत्नागिरीकरांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांनी सातत्याने याबाबत नगरपरिषदेतील कारभाऱ्यांकडे टाहो फोडूनही गेल्या दहा वर्षात काही घडले नाही, पाण्याची समस्या सुटली नाही. त्यामुळे सुधारित पाणीपुरवठा योजनाही त्याच परंपरेतील असावी, केवळ हुलकावणी दिली जात असावी, असेच रत्नागिरीकरांना वाटत होते. रत्नागिरीत सुधारित नळपाणी योजनेबाबत याआधी बरेच महाभारत घडून गेले आहे. या योजनेच्या सादरीकरणावरून शिवसेना व भाजप यांच्यात जोरदार राजकीय कलगी-तुरा रंगला होता. रत्नागिरी नगरपरिषदेच्या सभागृहात जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे सादरीकरण द्यावे, असा आग्रह शिवसेनेने धरला होता. त्यामुळे वातारवण तणावपूर्ण झाले होते. सभागृहाचा ताबा सेनेने घेऊ नये, यासाठी नगरपरिषदेने नियमानुसार सभागृह सील केले होते. या आठवणी ताज्या असतानाच ही सुधारित नळपाणी योजना तळमळीने प्रयत्न करून भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी मंजूर करून घेतली आहे. ६३ कोटींच्या या योजनचे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी सुरू करण्याच्या हालचालीही आता सुरू झाल्या आहेत. या कामाची सुरूवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे आधीही सांगण्यात आले होते. आता योजना मंजूर झाल्याने योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरीत येणार काय, त्यांच्या उपस्थितीत योजना आरंभाची सभा ‘निवडणूक प्रचार’ सभा ठरणार काय, याबाबत चर्चा रंगली आहे.
योजनेचा लाभ भाजपला होणार?
गेल्या सहा महिन्यांच्या काळापासून रत्नागिरीतील सुधारित नळपाणी योजना हा मोठा चर्चेचा विषय ठरला होता. राजकीय श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा शहरात होती. मात्र, भाजपने ही योजना मंजूर करून आणली. या योजनेचा शुभारंभही निवडणुकीपूर्वी होईल. त्यामुळे योजनेच्या या यशाचे रुपांतर येणाऱ्या निवडणुकीत भाजपच्या मतवाढीमध्ये होणार काय, भाजपचा थेट नगराध्यक्ष होणार काय, या प्रश्नांची चर्चा शहरात होत आहे.
बाळ माने यांनी मुख्यमंत्र्याकडे केला पाठपुरावा.
योजनेच्या आरंभासाठी मुख्यमंत्री येणार?
रत्नागिरीला पाणीपुरवठ्याचे वितरण करणारी व्यवस्था खराब.
अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करणेही अवघड.

 

Web Title: Improved Taps Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.