रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेचीच शिवसेना, गावपॅनेलची सरशी; ठाकरे गटाला मिळाल्या एवढ्याच ग्राम पंचायती
By मनोज मुळ्ये | Published: November 6, 2023 02:31 PM2023-11-06T14:31:17+5:302023-11-06T14:42:46+5:30
ठाकरे शिवसेनेकडून सोसल मीडियावर मात्र यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा दावा केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये चार ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेला तर चार ग्रामपंचायतींमध्ये गावपॅनेलला विजय मिळाला आहे. उद्धव ठाकरे शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी १ ग्रामपंचायत मिळाली आहे. दरम्यान, ठाकरे शिवसेनेकडून सोशल मीडियावर मात्र यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा दावा केला जात आहे.
मंडणगड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत शिवसेनेला तर एक ग्रामपंचायत गावपॅनेलला मिळाली आहे. मात्र सोशल मीडियावरुन ठाकरे शिवसेना या दोन्ही ग्रामपंचायती आपल्याच असल्याचा दावा करत आहे. दापोली तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती शिवसेनेला मिळाल्या आहेत. ठाकरे शिवसेनेला एकाच ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे.
चिपळुणातील तीन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये तीनही ठिकाणी गावपॅनेलला सत्ता मिळाली आहे. मात्र यातील दोन ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. देवरुखमध्ये एका ग्रामपंचायतीची निवडणूक होती आणि ती भाजपने जिंकली आहे. याआधी ही ग्रामपंचायत ठाकरे शिवसेनेकडे होती.