Ratnagiri: भांडणाच्या रागात मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून केला खून 

By मनोज मुळ्ये | Published: October 13, 2023 06:43 PM2023-10-13T18:43:36+5:302023-10-13T18:43:49+5:30

गणपतीपुळे : घरगुती भांडणाच्या रागातून वडिलांच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना निवेंडी- वरची समतानगर (ता. ...

In the anger of the quarrel the son killed his father by hitting him on the head with a wooden stick | Ratnagiri: भांडणाच्या रागात मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून केला खून 

Ratnagiri: भांडणाच्या रागात मुलाने वडिलांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून केला खून 

गणपतीपुळे : घरगुती भांडणाच्या रागातून वडिलांच्या डाेक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून केल्याची खळबळजनक घटना निवेंडी- वरची समतानगर (ता. रत्नागिरी) येथे घडली. सुरेश नावजी कदम (५८) असे मृत वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा राजेश सुरेश कदम (३८) याला जयगड पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (१२ ऑक्टाेबर) रात्री नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली.

निवेंडी वरची समतानगर येथे सुरेश कदम हे आपला मुलगा राजेश व मुलगी सुषमा असे एकत्रित राहत होते. घरगुती कारणावरून गुरुवारी रात्री सुरेश कदम व मुलगा राजेश यांच्यात वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन राजेश याने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. त्यात ते जागीच कोसळले. ते उठत नसल्याचे पाहून राजेशने आपला चुलत भाऊ विनेश कदम याला घरी बोलावून आणले. विनेश कदम यांनी पाहिले असता सुरेश कदम हे बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसले.

याविषयीची विनेश कदम यांनी तत्काळ निवेंडीचे पोलिस पाटील दिवाकर कदम यांना माहिती दिली. पोलिस पाटील कदम यांनी तत्काळ सरकारी रुग्णवाहिका बोलावून सुरेश कदम यांना खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जयगड पोलिसांनी राजेश कदम याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पाेलिस करत आहेत

Web Title: In the anger of the quarrel the son killed his father by hitting him on the head with a wooden stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.