राजापूर शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

By अरुण आडिवरेकर | Published: January 21, 2024 02:52 PM2024-01-21T14:52:08+5:302024-01-21T14:52:32+5:30

विजयकुमार पंडित हे शनिवारी दुपारी २:३० ते रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन कळसवली येथे गेले हाेते

In the city of Rajapur, the swindlers looted jewels worth five lakhs | राजापूर शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

राजापूर शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

राजापूर : शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडित यांचे समर्थनगर येथील राहते घर फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखाचे सोने, चांदीचे दागिने लांबविले. ही चाेरी शनिवारी झाली. भर वस्तीत झालेल्या चोरीने राजापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.
 
विजयकुमार पंडित हे शनिवारी दुपारी २:३० ते रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन कळसवली येथे गेले हाेते. रात्री घरी आल्यानंतर चाेरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी घरातील सामानाची तपासणी केली असता साेन्या, चांदीचे दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत राजापूर पाेलिसांना माहिती दिली.

चाेरीची माहिती मिळताच राजापूर पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत पाहणी केली. चाेरट्यांचा शाेध घेण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. ही चाेरी माहितीच्याच माणसाने केली असावी, असा संशय व्यक्त हाेत आहे. चाेरट्याने पाळत ठेवून घरात काेणी नसल्याचा फायदा उठवत डल्ला मारल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. याबाबत अधिक तपास राजापूर पाेलिस करत आहेत.

Web Title: In the city of Rajapur, the swindlers looted jewels worth five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.