Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 04:07 PM2022-12-12T16:07:07+5:302022-12-12T16:07:52+5:30

शिंदे गटातील कार्यकर्त्यांचा गावकी, भावकीचा दबाव

In the village panchayat elections, the sarpanch post candidate in Konkan was defeated by the Shinde group | Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

Gram Panchayat Election: कोकणात सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी

Next

मंडणगड : वेसवी येथील महाविकास आघाडीच्यासरपंचपदाच्या उमेदवार मानसी तरळ व त्यांचे पती विनायक तरळ यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला नसल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे रविवारी (११ डिसेंबर) पत्रकार परिषदेत करण्यात आला. सरपंचपदाच्या उमेदवाराची शिंदे गटाकडून पळवापळवी करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

निवडणूक अर्ज मागे घेतल्याची तारीख संपल्यानंतर १० डिसेंबर २०२२ रोजी वेसवीच्या महाविकास आघाडीच्या सरपंचपदाच्या उमेदवार व त्यांचे पती या दोघांनी आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश केल्याचे सांगण्यात आले. शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिल्याचेही जाहीर करण्यात आले. याबाबत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन या वृत्ताचे खंडन केले.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रकाश शिगवण, रघुनाथ पोस्टुरे, फैरोज उकये, वैभव कोकाटे, सुभाष सापटे, अनिल रटाटे, विनायक तरळ, मानसी तरळ, हरसरत खोपटकर, वसीम मुल्ला यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुझफ्फर मुकादम यांनी शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर टीका करताना लोकशाही मार्गाने निवडणूक जिंकण्याचे आवाहन केले. २०१९ पासून मतदारसंघातील राजकारणाचा स्तर खालावलेला असल्याचे ते बाेलले. विद्यमान  आमदारांना मते मिळवण्यासाठी त्यांनी केलेली विकासकामे व कामाची पद्धत यावर विश्वास राहिलेला नाही. वर्चस्व गाजवण्यासाठी विकासाचे मूळ मुद्दे व तालुक्यातील जनतेचे प्रश्न बाजूला सारून ते करीत असलेल्या राजकारणाची नोंद येथील मतदारांकडे असल्याचे मुकादम म्हणाले.

आमदार जनतेच्या प्रश्नावर काम करण्यापेक्षा जातीमध्ये, भावकीमध्ये, गावामध्ये तंटे निर्माण करुन आपले राजकारण पुढे नेत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. प्रकाश शिगवण यांनी तेरा ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी शिंदे गटास धोबीपछाड दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. तर उमेदवारांच्या पळवापळवीच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.

गावकी, भावकीचा आमच्यावर दबाव

तरळ पती-पत्नी यांनी खुलासा करताना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आमच्यावर गावकी व भावकीचा दबाव आणून आम्हा दोघांना आमदारांकडे घेऊन गेल्याचे सांगितले; मात्र आम्ही महाविकास आघाडीतच असून, निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे मानसी तरळ व विनायक तरळ यांनी सांगितले.

Web Title: In the village panchayat elections, the sarpanch post candidate in Konkan was defeated by the Shinde group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.