रत्नागिरीत रोपे विक्री केंद्राचे उद्घाटन, २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:56 PM2018-07-02T16:56:37+5:302018-07-02T16:58:58+5:30
येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
रत्नागिरी : येत्या १ जुलैपासून राज्यात सर्वत्र राबविण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमात रत्नागिरी जिल्हा सहभागी झाला आहे. जिल्ह्याला २० लाख ५४ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
या लागवडीसाठी रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे सवलतीच्या दरात रोपे विक्री केंद्र सुरू केले आहे. रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे नगरसेवक प्रशांत साळुंखे यांच्या हस्ते या विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ह्यरोपे आपल्या दारीह्ण या उपक्रमांतर्गत सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेली रोपे ८ ते ४० रूपये दराने विकण्यात येत आहेत. बदाम, करंज, पिंपळ, बेल, कडूलिंब, गुलमोहर जातीच्या रोपांची विक्री याठिकाणी करण्यात येत आहे.
हा विक्री स्टॉल १० जुलैपर्यंत सुरु राहणार आहे. या स्टॉलचे उद्घाटनाला सामाजिक वनीकरण विभागाचे वन अधिकारी सी. एल. धुमाळ तसेच सामाजिक वनीकरण विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.