गाेळप येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:35 AM2021-08-20T04:35:29+5:302021-08-20T04:35:29+5:30
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन सरपंच मिताली भाटकर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन सरपंच मिताली भाटकर यांच्या हस्ते वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पावस प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्रे कार्यरत असून, त्यात गणेशगुळे उपकेंद्राला गेली अनेक वर्षे स्वतःची इमारत अथवा जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे आरोग्याच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने या भागात असलेल्या रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा देणे गैरसोयीचे होत होते. अखेर त्या ठिकाणी जागा उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गोळप येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी लावून धरली. त्यासाठी उपकेंद्र मंजूर करण्यात आले. गोळप ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीमध्ये उपकेंद्राकरिता जागा उपलब्ध करून दिली. त्या उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे या परिसरातील लोकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. यावेळी उपसरपंच जिगर पावसकर, बंधू वारिसे, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.