कडवईत संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:22 AM2021-06-17T04:22:10+5:302021-06-17T04:22:10+5:30
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातील कर्मचारी ...
आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून संस्थात्मक विलगीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारातील कर्मचारी निवास इमारतीमध्ये हे केंद्र सुरू करण्यात आले असून, याचा फायदा परिसरातील दहा ते पंधरा गावांमधील कोरोना रुग्णांना होणार आहे.
राज्य सरकारने आता गावागावात संस्थात्मक विलगीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी कडवई ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. गेली दोन वर्षे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांअभावी बंद असणाऱ्या कडवई येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नुकत्याच बांधलेल्या दोन इमारतींमध्ये हे विलगीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कडवई ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाला तुरळ, राजवाडी, चिखली ग्रामपंचायतींचे सहकार्य मिळाले आहे. याठिकाणी सध्या सोळा बेड असून, विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. भविष्यात याठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा देण्याचा मानस असल्याचे जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी सांगितले.
यावेळी कडवई सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, राजवाडी सरपंच अस्मिता देवरुखकर, उपसरपंच दिलीप गुरव, तुरळ उपसरपंच शंकर लिंगायत, चिखली सरपंच कानाल, शेनवडे सरपंच दत्ता लाखन, कडवई ग्रामविकास अधिकारी किरण भुसारे, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजेंद्र सुर्वे, वैद्यकीय अधिकारी संतोष यादव, प्रभाकर घाणेकर, पंचायत समिती सदस्य प्रेरणा कानाल, तुरळचे माजी उपसरपंच अरविंद जाधव, कडवईचे ग्रामपंचायत सदस्य सोमा मादगे, राजन दळवी, अनिस खान, संघवी भिंगार्डे, ग्रामस्थ अनंत उजगावकर, नीलेश कुंभार, मिलिंद शिंदे, आदी उपस्थित होते.