पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 02:07 PM2022-02-12T14:07:54+5:302022-02-12T15:56:23+5:30

केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

Inclusion of Ambadwe village in Panchteerth development program says President Ramnath Kovind | पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पंचतीर्थ विकास कार्यक्रमात आंबडवे गावाचा समावेश करावा : राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Next

मंडणगड : केंद्र शासनातर्फे पंचतीर्थांच्या विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या पंचतीर्थ विकासामध्ये मंडणगड तालुक्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आंबडवे गावाचाही समावेश करावा असे राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी आंबडवे येथे बाेलताना सांगितले.

राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांनी शनिवारी सकाळी आंबडवे गावाला भेट दिली. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर विद्यामंदिरात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.

यावेळी राष्ट्रपती काेविंद म्हणाले की, हे स्थान असे आहे की, याठिकाणी येणारा हा प्रत्येकजण भावूक हाेताे. केंद्र शासनातर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृति जपणाऱ्या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे. पंचतीर्थ या नावाने हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामध्ये माहू, नागपूर, दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील स्थळांचा समावेश करावा असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की,  शिक्षण हेच मानवाच्या प्रगतीचे माध्यम आहे, हे बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखले हाेते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिले हाेते. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देताना बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला पहिले स्थान दिल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार अमर साबळे यांनी या गावाच्या विकासासाठी निधी दिला आहे. विकासासाठी व्यक्ती आणि संस्थांनी आपले याेगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Inclusion of Ambadwe village in Panchteerth development program says President Ramnath Kovind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.