कर्मचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:21 AM2021-06-20T04:21:43+5:302021-06-20T04:21:43+5:30

राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कराडे ब्राह्मण संघातर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे ...

Inconvenience to staff | कर्मचाऱ्यांची गैरसोय

कर्मचाऱ्यांची गैरसोय

Next

राणी लक्ष्मीबाईंना अभिवादन

रत्नागिरी : राणी लक्ष्मीबाई यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त कराडे ब्राह्मण संघातर्फे अभिवादन करण्यात आले. कोरोना महामारीमुळे यावर्षीही कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही. यावेळी माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, विद्यमान अध्यक्ष माधव हेर्लेकर, प्रतिभा प्रभूदेसाई, आदी उपस्थित होते.

आरक्षण फुल

रत्नागिरी : कोरोनामुळे गतवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबईकरांना गावी येणे शक्य झाले नव्हते. कोकणात येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे आरक्षण गणेशोत्सवासाठी सुरू करताच अवघ्या काही तासांतच आरक्षण फुल्ल झाले. ५ ते ९ तारीख या कालावधीतील सर्व गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

वृक्षारोपण

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रत्नदुर्ग किल्ल्यावर रत्नागिरी शाखेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिमये, प्रांतीक सदस्य बशीर मुर्तूझा, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य उजेर काझी, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, आदी उपस्थित होते.

कार्यपद्धत मार्गदर्शन

रत्नागिरी : शासन निर्णयानुसार दहावीसाठी मूल्यमापन, कार्यपद्धती जाहीर केली आहे. मूल्यमापनाबाबतचा सर्व तपशील व विषयनिहाय परिशिष्टे, वेळापत्रक मंडळाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी मूल्यमापन प्रक्रिया वेळेवर पूर्ण करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित केली आहे.

छात्रसंवाद

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण रत्नागिरीतर्फे गोगटे जोगळेकर महाविद्यालयात गुगल मीटच्या माध्यमातून छात्रसंवाद नावीन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आला. कोकण प्रदेश सहमंत्री अमित ढोमसे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांना योग्य समर्पक उत्तरे दिली.

ग्रामीण फेऱ्या बंद

देवरुख : अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार ग्रामीण भागातील बसफेऱ्या दि. २० जूनपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साखरपा -देवरुख व रत्नागिरी मार्गावरील मोजक्याच फेऱ्या सुरू राहणार आहेत. दिनांक २१ पासून वरिष्ठांच्या आदेशानुसार बसफेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत.

पथदर्शी प्रकल्प

रत्नागिरी : जिल्ह्यांच्या विविधांगी विकासाकरिता संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. आंबा, काजू, खेकडा, मत्स्यशेती व पर्यटन व्यवसायाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.

वृक्षारोपणाचा इशारा

लांजा : राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. हे खड्डे न भरल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित राजेशिर्के यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी लांजा तहसीलदारांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय महामार्ग ६६ चे चौपदरीकरण सुरू आहे.

नागरिकांची गैरसोय

रत्नागिरी : येथील सेतू कार्यालय बंद असल्याने मुलांच्या प्रवेशाला खीळ बसली आहे. विविध दाखल्यांमुळे अनेक शासकीय कामे रखडली आहेत. त्यामुळे सेतू कार्यालय त्वरित सुरू करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. कार्यालय बंद असल्याने आवश्यक दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सेतू कार्यालय सुरू करावे.

Web Title: Inconvenience to staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.