कोरोना रुग्णसंख्येत वाढ; २४ तासांत १५० रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:49+5:302021-09-08T04:38:49+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १५० नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा ...
रत्नागिरी : जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी एका दिवसात जिल्ह्यात १५० नव्या रुग्णांची भर पडली असून दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ११८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ७६,६०७ इतकी झाली असून २३६२ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. आतापर्यंत ७२,९७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९२७ जण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांतील कोरोना चाचणीच्या अहवालात १५० जण पाॅझिटिव्ह आले आहेत. यात अँटिजन चाचणीत ४३ आणि आरटीपीसीआर चाचणीत १०७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत, तर ३५११ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. चिपळूण आणि रत्नागिरी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ९२७ जण उपचार घेत आहेत. त्यापैकी गृहविलगीकरणात ४७० आणि संस्थात्क विलगीकरणात ४५७ जण उपचार घेत आहेत. केअर सेंटरमध्ये १०९, डीसीएचसीमध्ये १७२ आणि डीसीएचमध्ये १७६ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ५६ जण आयसीयूमध्ये दाखल असून ७९ जणांना ऑक्सिजन सुरू आहे.
आतापर्यंत झालेल्या एकूण २,३६२ मृत्यूंपैकी ५० आणि त्यावरील वयोगटातील १९८२ रुग्ण असून सहव्याधी असलेल्या ८३२ रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत ७ लाख ६२ हजार १९६ कोरोना चाचणी करण्यात आल्या. त्यापैकी ३ लाख ५८ हजार १८८ आरटीपीसीआर चाचण्या, तर ४ लाख ४ हजार ८ अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने चाचण्या वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.