जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, नवे ४२९ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:22 AM2021-07-08T04:22:02+5:302021-07-08T04:22:02+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने उसळी घेतली असून, बुधवारी ४२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६५,०२४ झाली ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने उसळी घेतली असून, बुधवारी ४२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६५,०२४ झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ८.४६ टक्के झाला आहे. कोरोनाने ८ रुग्णांचा बळी गेला असून, आजपर्यंत १,८३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात ४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ५७,६६७ लोक बरे झाले आहेत.
जिल्ह्यात एका दिवसात ३,२९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २७९ जण बाधित असून, मागील १५० बाधित रुग्णांचाही समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ११, खेडमध्ये २०, गुहागरात २४, चिपळुणात ४५, संगमेश्वरात ३८, रत्नागिरीत ९४, लांजात ९ अणि राजापुरात ३८ रुग्ण सापडले आहेत.
जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील २, दापोलीतील ३, चिपळूण, खेड आणि रत्नागिरीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.८२ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के आहे.