ऐन सणात आवक घटल्याने फुलांच्या दरात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:02 PM2020-10-23T13:02:31+5:302020-10-23T13:03:55+5:30
Navratri, temple, Ratnagirinews नवरात्रोत्सव सुरू असल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. दररोज घटाची पूजा करण्यात येत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये झेंडू, कमळ, शेवंती, गुलाब, निशिगंधा, लीली आदी विविध प्रकारच्या फुलांना मागणी होत आहे. याशिवाय फुलांच्या माळा, वेणी, गजरे यांचाही खप होत असला तरी आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.
रत्नागिरी : नवरात्रोत्सव सुरू असल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. दररोज घटाची पूजा करण्यात येत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. त्यामध्ये झेंडू, कमळ, शेवंती, गुलाब, निशिगंधा, लीली आदी विविध प्रकारच्या फुलांना मागणी होत आहे. याशिवाय फुलांच्या माळा, वेणी, गजरे यांचाही खप होत असला तरी आवक मोठ्या प्रमाणात होत नसल्याने फुलांचे दरही वाढले आहेत.
नवरात्रोत्सवात श्री दुर्गामातेचे सर्वत्र पूजन करण्यात येत आहे. नऊ दिवस घटाला माळ अर्पण करण्यात येत असल्यामुळे फुलांना वाढती मागणी आहे. शिवाय उत्सव कालावधीत देवीची ओटी भरण्यात येत असल्याने सुटी फुले, हार, वेण्यांनाही मागणी होत आहे.
याशिवाय दसरा सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो. यादिवशी शस्त्रात्र, वाहनांची पूजा करण्यात येते. घराच्या दरवाजालाही नवधान्याच्या तोरणांबरोबर फुलांचे तोरण लावण्यात येते. त्यामुळे फुलांना विशेष मागणी होत आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने फुलशेती बहरली होती. मात्र, परतीच्या पावसामुळे पिकांची हानी झाली. असल्याने फुलांची आवक घटली आहे. जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनीही झेंडू लागवड केली असून, तयार झेंडू बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी फुलांचे दर वाढले आहेत. दसऱ्याला खप वाढण्याची शक्यता आहे.
केशरी, पिवळा झेंडू १०० ते १२० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. शेवंती, निशिगंधा, लीली १०० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. शेवंतीची वेणी ३० ते ३५ रुपये दराने विकण्यात येत आहे. नवरात्रीपासून फुलांच्या दरात वाढ झाली आहे. दीपावलीपर्यंत फुलांना मागणी राहणार आहे. परतीचा पाऊस अधूनमधून धुमाकूळ घालत असल्याने फुलांच्या शेतीचे नुकसान होत आहे. उत्पादनावर परिणाम झाल्यास व्यवसायातही घट होण्याची शक्यता आहे.