माखजन कासे रस्त्याची उंची वाढवा : बाबू मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:36 AM2021-08-25T04:36:08+5:302021-08-25T04:36:08+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पेढांबे मार्गावरील कासे येथील जोडरस्त्याची उंची वाढवावी. पावसाळ्यात या खाडी भागात गावांचा संपर्क तुटत ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पेढांबे मार्गावरील कासे येथील जोडरस्त्याची उंची वाढवावी. पावसाळ्यात या खाडी भागात गावांचा संपर्क तुटत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लोकप्रतिनिधींनी व शासनाने याकडे तत्काळ लक्ष घालून या मार्गाची उंची वाढवावी, अशी मागणी मावळंगचे शाखाप्रमुख बाबू मोरे यांनी केली आहे.
बाबू माेरे यांनी म्हटले आहे की, हा मार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जातो. अशावेळी कासे, असावे, पेढांबे, नारडुवे, वीर, पुर्ये, कळंबुशी आदी गावांचा संपर्क तुटतो. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानाला सामोरे जावे लागते. सतीश साठे यांच्या घरानजीक पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या उंची नळ्यांची गरज आहे. या ठिकाणी पाण्याचा प्रवाह जास्त असतो, तसेच या ठिकाणी पाणी साचत असल्याने धोकादायक स्थिती निर्माण होते, तसेच या गावासह परिसरातून माखजन हायस्कूलमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत असते. माखजन मुख्य रस्ता ते पुलापर्यंत मार्गावर भराव टाकूनच उंची वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.