लांजात काेराेनाग्रस्तांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:56+5:302021-06-16T04:42:56+5:30

लांजा : तालुक्यातील काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून, सोमवारी आणखी ७४ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ...

An increase in the number of carcinogens in the lungs | लांजात काेराेनाग्रस्तांमध्ये वाढ

लांजात काेराेनाग्रस्तांमध्ये वाढ

Next

लांजा : तालुक्यातील काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली असून, सोमवारी आणखी ७४ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर दोघा रुग्णांचा बळी गेला आहे.

तपासणीत अँटिजनचे ४३, तर आरटीपीसीआरचे २५ जण आहेत, तसेच दि. १३ जून रोजी शहरामध्ये फिरणाऱ्या नागरिकांचे कोरोना स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये ६ जणांचे आरटीपीसीआर असे एकूण ७४ जणांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये मठ -असोडे ४, इंदवटी २, विवली २, भांबेड १, प्रभानवल्ली १, सालपे घागवाडी ७, कोट जोशीवाडी ३, हर्चे ९, वेरवली खुर्द कातळवाडी २, लांजा कुंभारवाडी १, वाडगांव १७, लांजा कोत्रेवाडी ५, लांजा गणेशवाडी १, लांजा एस. टी. डेपो १, लांजा न्यू इंग्लिश स्कूल १, कुवे बौद्धवाडी २, कुवे गुरववाडी ९ यांचा समावेश आहे़ तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या २७९० इतकी झाली आहे. आतापर्यंत २०९८ कोरोना रुग्णांनी मात केली आहे. सध्या तालुक्यात ५८४ कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

Web Title: An increase in the number of carcinogens in the lungs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.