देवरूखात आयसाेलेशन केंद्रांची संख्या वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:33 AM2021-05-11T04:33:06+5:302021-05-11T04:33:06+5:30
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांनी देवरूख येथील ...
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांनी देवरूख येथील पंचायत समिती कार्यालयात बैठक घेतली. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली तसेच आयसोलेशन केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी यासाठी चर्चा करण्यात आली.
या अनुषंगाने साखरपा आणि कडवई या दोन ठिकाणी आयसोलेशन केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साखरपा येथे आयसाेलेशन केंद्र सुरूही करण्यात आले़ तसेच लसीकरण मोहीम अंतर्गत तालुक्याला येणाऱ्या अपुऱ्या लस पुरवठ्याबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून तालुक्याला मुबलक साठा मिळावा याची मागणी करण्यात येणार आहे.
यावेळी सभापती जयसिंग माने यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुवड, माधवी गीते, माजी सभापती सारिका जाधव, पंचायत समिती सदस्य संजय कांबळे, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस़ एस़ सोनावणे, नायब तहसीलदार अनिल गोसावी, सर्व प्राथमिक आणि ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
------------------------------
संगमेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सभापती जयसिंग माने यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य आणि तालुका आरोग्य विभागाची बैठक घेऊन चर्चा केली़