फळबाग लागवडीमुळे मजुरांच्या संख्येत वाढ

By admin | Published: September 25, 2016 11:12 PM2016-09-25T23:12:16+5:302016-09-25T23:12:16+5:30

रोजगार हमी योजना : जिल्ह्यात ५०० हेक्टरवर लागवड

Increase in number of laborers due to Horticulture | फळबाग लागवडीमुळे मजुरांच्या संख्येत वाढ

फळबाग लागवडीमुळे मजुरांच्या संख्येत वाढ

Next

शोभना कांबळे ल्ल रत्नागिरी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह््यात चालू आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू असून, यातून ४ हजार ७०५ इतक्या मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या कालावधीत जिल्ह््यात सुमारे ५०० हेक्टर जमिनीवर फळबाग लागवड करण्यात आल्याने तसेच इंदिरा आवास योजनेच्या कामांना प्रारंभ झाल्याने मजुरांच्या संख्येत वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात नांदेड, बुलढाणा, गडचिरोली, अमरावती, नंदुरबार, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, अहमदनगर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये या कामांत घट झाली असून, नाशिक, रत्नागिरी, जळगाव, सातारा, धुळे या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह््यात आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू असून, त्यातून ४ हजार ७०५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. या एकूण कामांपैकी ११८ कामे ग्रामपंचायत स्तरावर तर २२८ कामे शासकीय यंत्रणा स्तरावरील आहेत. यासाठी प्रत्येकी १,५२२ आणि ३,१८३ अशी एकूण ४,७०५ इतकी मजूर उपस्थिती आहे. चालू आठवड्यात फळबाग लागवड तसेच इंदिरा आवास योजनेच्या कामांना सुरूवात झाल्याने मजुरांची संख्याही वाढली आहे. चालू आठवड्यात सुमारे ५०० हेक्टर जागेवर फळबाग लागवड करण्यात आली आहे.
जिल्ह््यात ग्रामपंचायत शेल्फवर ५३१४ तर शासकीय यंत्रणा स्तरावर २५२६ अशी एकूण ७ हजार ८४० इतकी कामे शेल्फवर ठेवण्यात आली आहेत. यामध्ये मजूर क्षमता ग्रामपंचायत स्तरावर २ लाख ५८ हजार ६९३ आणि शासकीय यंत्रणा स्तरावर २ लाख ८९ हजार ५०१ अशी एकूण ५ लाख ४८ हजार १९४ इतकी आहे.
रोजगार हमी योजना मजुरीपुरती मर्यादित न ठेवता त्यामधून वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर होऊन कायमस्वरूपी टिकाऊ भत्ता निर्माण व्हावा, यासाठी महत्त्वाच्या ११ कामांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.
यामध्ये सिंचन विहिरी, शेततळे, गांडूळ खत, नाडेप कंपोस्टींग, फळबाग लागवड, शौचालये, शोषखड्डे, गाव तलाव, पारंपरिक पाणीसाठ्याचे नुतनीकरण व गाळ काढणे, जलसंधारणाची कामे, रोपांची निर्मिती, वृक्षलागवड, संगोपन व संरक्षण, ग्राम सबलीकरण (क्रीडांगणे, अंगणवाडी), ग्रामपंचायत भवन, स्मशानभूमी सुशोभिकरण, गावांतर्गत रस्ते, घरकुल, गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन शेड, मत्स्यव्यवसाय ओटे) यांचा समावेश आहे.
ही कामे मोहीम स्वरूपात राबविण्यात येत असून, यासाठी ग्रामपंचायत, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण, वनविभाग, ग्रामविकास व महिला बालकल्याण विभागाचा सहभाग असणार आहे.
दहा जिल्ह्यांत घट : वैयक्तिक लाभ
राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये घट झाली आहे.
जिल्ह्यात आठवड्यात एकूण ३४६ कामे सुरू.
ग्रामपंचायत शेल्फवर ५ हजार ३१४ कामे.
वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू.
 

Web Title: Increase in number of laborers due to Horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.