काेराेनाला राेखण्यासाठी चाचण्या वाढवा : याेगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:21+5:302021-05-05T04:52:21+5:30

खेड : तालुक्यातील तळे व आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार योगेश कदम यांनी भेट देऊन आढावा घेतला. ...

Increase tests to track carina: step by step | काेराेनाला राेखण्यासाठी चाचण्या वाढवा : याेगेश कदम

काेराेनाला राेखण्यासाठी चाचण्या वाढवा : याेगेश कदम

Next

खेड : तालुक्यातील तळे व आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रांना आमदार योगेश कदम यांनी भेट देऊन आढावा घेतला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर कोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अँटिजेन चाचणी तसेच आरटीपीसीआर चाचणी वाढविण्याबाबत सूचना दिल्या.

सद्यस्थितीत किती कोरोना बाधित रुग्ण आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आहेत. त्यातील किती लक्षणे असणारे आहेत, किती लक्षणे नसणारे आहेत. त्यांना कोठे अलगीकरण केले आहे. त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत. दर २ दिवसांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी गृह अलगीकरण असलेल्या रुग्णाला तपासायला जातात की नाही यांची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत जास्तीत जास्त सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांवर नवीन नियुक्ती लवकरात लवकर करून देण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे या भेटी दरम्यान सांगितले.

गरोदर मातांना पंतप्रधान मातृत्व योजनेतून मिळणाऱ्या पाच हजार रुपयांच्या अर्थसहाय्यविषयी आरोग्य केंद्रातून माहिती घेतली. यावेळी सभापती मानसी जगदाळे, तालुकाप्रमुख विजय जाधव, महेंद्र भोसले, श्रीकांत शिर्के, उपनगराध्यक्ष सुनील दरेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके, डॉ. किरण पाटील, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. दत्तकुमार गेजगे, आरोग्य सहाय्यक उत्तम देवकाते, आरोग्य सहाय्यक नरेश इदाते, औषध निर्माण अधिकारी मदन जाडकर तसेच आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.

.......................................

khed-photo42

खेडचे आमदार योगेश कदम यांनी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आढावा घेतला.

Web Title: Increase tests to track carina: step by step

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.