वाढीव रक्कम माफ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:31 AM2021-07-29T04:31:19+5:302021-07-29T04:31:19+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माडीविक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरूपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माडीविक्रेत्यांकडून परवाना शुल्काच्या स्वरूपात घेण्यात आलेली वाढीव रक्कम माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. माडीविक्रेत्यांना शासनाच्या या निर्णयाने दिलासा मिळणार आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाला पाच लाखांहून अधिक महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
खजिनदारपदी शिंदे
खेड : चोरवणेचे सुपुत्र प्रवीण शिंदे यांची एक वर्षाकरिता महाराष्ट्र जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या खजिनदारपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी आलोक मेहता, उपाध्यक्षपदी सुनील खुशलानी, सहसचिवपदी महेश मधखोलकर, पार्थ बधेका यांची निवड करण्यात आली आहे.
मच्छी मार्केटचे उद्घाटन
दापोली : दापोली तालुक्यातील हर्णै येथे नागरी सुविधा योजना व हर्णै ग्रामपंचायत फंडातून नव्याने बांधलेल्या मच्छी मार्केटचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार योगेश कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत झाले. बराच काळ या मार्केटची मागणी केली जात होती.