अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:22 AM2021-06-22T04:22:00+5:302021-06-22T04:22:00+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर ...

Increased rates of vegetables in range after unlock | अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

अनलाॅकनंतर भाजीपाल्याचे वाढलेले दर आवाक्यात

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली असली तरी कडक निर्बंधामुळे विक्रीवर परिणाम झाला होता. अनलाॅक करण्यात आल्यानंतरही काही दिवस भाज्यांचे दर वाढलेलेच होते. पावसामुळे भाजीपाला आवक मंदावली असली तरी भाज्यांचे दर बऱ्यापैकी खाली आले आहेत. बटाट्याचे दर स्थिर असले तरी कांदा व टोमॅटोचे दर मात्र खाली आल्याने ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊनमुळे कडक निर्बंध असल्याने विक्रीवर परिणाम झाला होता, परंतु अनलाॅकनंतर व्यवहार शिथिल झाले आहेत. भाज्या उपलब्ध होत असून मागणीही वाढली आहे. लाॅकडाऊन काळात तसेच अनलाॅक झाल्यानंतर काही दिवस भाजीचे दर शंभरच्या पटीत होते; मात्र पुन्हा दर हळूहळू खाली येऊ लागल्याने ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

लाॅकडाऊन काळात भाज्यांची उपलब्धता कमी होती, शिवाय दरही भरमसाठ होते. अनलाॅकनंतर सुरुवातीला काही दिवस दर तसेच राहिले मात्र आवक वाढली तसे दर खाली आले. परंतु भाज्यांच्या दरामुळे कंबरडे मोडत असून मोजक्याच भाज्या खरेदी करतो.

- सुनीता कदम, गृहिणी

कुटुंबात जास्त सदस्य असतील तर दरामुळे भाज्या परवडत नाही. अशावेळी कडधान्यांची निवड करावी लागते. मात्र कडधान्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकवेळा भाज्या, उसळी रद्द करून वरणभातावरच भागवावे लागत आहे.

- अनिता पागदे, गृहिणी

लाॅकडाऊन काळात तसेच त्यानंतरही चार-पाच दिवस भाज्यांची आवक अत्यल्प प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यावेळी घाऊक दरातच वाढ असल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाला होता. पावसामुळे आवक थोडी कमी असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

- संतोष चव्हाण, विक्रेता

परजिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात भाजीपाला विक्रीसाठी येतो. बाजार समिती आवारात लिलाव झाल्यानंतर भाज्या विक्रीसाठी स्थानिक बाजारात येतात. परगावातून येणाऱ्या भाज्यांचे दर कमी/अधिक असतील त्याप्रमाणेच किरकोळ विक्री करावी लागते.

- दर्शन रोकडे, विक्रेता

मे महिन्यात झालेल्या ‘तौक्ते’ वादळामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यानंतर सुरू झालेला पाऊस आतापर्यंत कायम होता. त्यामुळे शेतातील पिकाचे नुकसान झाले. भाज्यांना मागणी असताना वादळाचा फटका बसला आहे.

- रमेश शिंदे, शेतकरी

यावर्षी लांबलेला पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झाले. उत्पादनासाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यामुळे मागणी असताना, भाज्या उपलब्ध करू शकलो नाही. आर्थिक भुर्दंड मात्र चांगलाच बसला.

- स्वप्नील कुळये, शेतकरी

Web Title: Increased rates of vegetables in range after unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.