संगमेश्वर तालुक्यात टंचाईत वाढ
By Admin | Published: April 12, 2017 03:26 PM2017-04-12T15:26:21+5:302017-04-12T15:26:21+5:30
१७ गावांमधील २८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ
आॅनलाईन लोकमत
देवरूख, दि. १२ : संगमेश्वर तालुक्यातील १७ गावांमधील २८ वाड्यांना पाणी टंचाईची झळ पोहोचली आहे. यातील ४ गावे व ६ वाड्यांना एका शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.
तामपानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे.काही ठीकाणी नदी, नाले, विहीरी अक्षरश: कोरड्या पडल्याचे चित्र आहे. संगमेश्वर तालुक्यातील १७ गावे व २८ वाड्यांना पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. टँकर सुरू करण्यात यावा अशी मागणी पं. स. पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आली आहे. यानुसार पंचायत समिती व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गाव व वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.
आवश्यकता असलेल्या गाव व वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे. एकदिवस आड पाणी पुरवठा केला जात आहे. यामध्ये बेलारी खुर्द माची धनगरवाडी, निवळी धनगरवाडी, शृंगारपुर कातुर्डीकोंड व पाचांबे गावातील नेरदवाडी, जखीणटेप, मेढे या वाड्यांना एक शासकीय टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. मागणी असलेल्या गावांना लवकरात लवकर टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)