इंदुराणी जाखड यांची सविता कामत विद्यामंदिरला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:28 AM2021-04-03T04:28:01+5:302021-04-03T04:28:01+5:30
फोटो मजकूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी गुरूवारी येथील आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरला ...
फोटो मजकूर
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी गुरूवारी येथील आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरला भेट दिली. त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा समाज कल्याण अधिकारी डाॅ. यतीन पुजारी, कनिष्ठ सहाय्यक डी. एम. आंबवले, आस्था फाऊंडेशनच्या संचालिका सुरेखा जोशी या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड यांनी गुरूवारी येथील आविष्कार संस्थेच्या सौ. सविता कामत विद्यामंदिरला भेट दिली. यावेळी त्यांनी या शाळेच्या उपक्रमांची माहिती घेतली. शाळेच्या कार्याची माहिती घेताना त्यांनी समाधान व्यक्त केले.
त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर (प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा), जिल्हा समाज कल्याण अधिकारी डाॅ. यतीन पुजारी, कनिष्ठ सहाय्यक डी. एम. आंबवले, आस्था फाऊंडेशन, रत्नागिरीच्या संचालिका सुरेखा जोशी या होत्या.
या भेटीसाठी जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉ. यतीन पुजारी यांनी सहकार्य केले. या मान्यवरांनी शाळेतील प्रत्येक वर्गाची, वर्गातील उपक्रमाची माहिती कर्मचाऱ्यांकडून घेतली. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यास आणि ॲक्टिव्हिटी घरून करून घेण्यासाठी शिक्षक आणि कर्मचारी रोज शाळेत येऊन शैक्षणिक साहित्य तयार करत. या शैक्षणिक साहित्याची पहाणी करून डाॅ. जाखड यांनी कौतुक केले.
शैक्षणिक साहित्य तयार करून प्रत्येक महिन्याला पालकांना शाळेत बोलावून मुलांकडून अभ्यास आणि ॲक्टिव्हिटी कशी करून घ्यावी, याचं प्रात्यक्षिक पालकांना दिलं जातं आणि त्याचा फिडबॅक वाॅट्सॲप वापरून घेतला जातो. याबद्दल मान्यवरांनी कुतूहलाने जाणून घेतलं आणि समाधान व्यक्त केलं.
सध्या विशेष शाळांना Early Intervention center करून दिव्यांग व्यक्तिंना मार्गदर्शन द्यायचे आहे. त्यासाठी २००२-०३ पासून संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. या संस्थेतर्फे डाॅ. इंदुराणी जाखड यांना शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला पुष्पगुच्छ स्मरणभेट देऊन आभार व्यक्त करण्यात आले.