परप्रांतीय नौकांची घुसखोरी, पण गस्तीसाठी नौकाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 04:21 PM2020-11-03T16:21:50+5:302020-11-03T16:22:22+5:30
Fishry, Department, Ratnagirinews मासेमारी हंगाम सुरु होऊन तीन महिने उलटले तरीही मत्स्य विभागाकडे गस्ती नौकाच उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीत अतिक्रमण करत मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांना मोकळे रान मिळाले आहे़.
रत्नागिरी : मासेमारी हंगाम सुरु होऊन तीन महिने उलटले तरीही मत्स्य विभागाकडे गस्ती नौकाच उपलब्ध झालेली नाही़ त्यामुळे जिल्ह्याच्या हद्दीत अतिक्रमण करत मासेमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांना मोकळे रान मिळाले आहे़.
परराज्यातील नौकांकडून सातत्याने घुसखारी केली जात आहे. त्यांच्या नौका अत्याधुनिक असल्यामुळे स्थानिक मच्छिमार त्यांच्या आसपासही फिरकत नाहीत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मच्छिमारांकडून मागणी करण्यात येत आहे़ परंतु मत्स्य विभागाला अजूनही भाड्याने गस्ती नौकाच मिळालेली नाही. स्वत:ची गस्ती नौका नसल्यामुळे दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवून नौका भाड्याने घ्यावी लागते़.
१ ऑगस्टला हंगाम सुरु होतो. आता ऑक्टोबर महिना संपत आला तरीही मत्स्य विभागाकडे नौका उपलब्ध नसल्याने कारवाई होणार कशी करायची, असा प्रश्न आहे.
समुद्रात १० ते १२ वाव अंतरामध्ये परराज्यातील नौकांचा धुमाकूळ सुरु असतो. सध्या मत्स्य विभागाकडून बंदरावर उभे राहून गस्त घालावी लागत आहे. यामध्येही विना परवाना मासेमारीसाठी जाणाऱ्यांचा फायदा होत आहे. गेल्या काही दिवसांत कोटींची मासळी परप्रांतीयांनी नेली आहे़ याचा फटका स्थानिक मच्छिमारांना बसणार आहे़
भाडेतत्त्वावर घेणार नौका
गस्ती नौका भाड्याने घेण्यासाठी निविदा काढण्यात आली होती़ त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरु आहे़ येत्या दोन दिवसांत नौका विभागाकडून सांगण्यात आले़ २०० हॉर्सपॉवरची नौका भाड्याने घेण्यात येणार आहे़