तेलाला महागाईची उकळी; बजेट बिघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:38 AM2021-09-08T04:38:38+5:302021-09-08T04:38:38+5:30
मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तसेच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. साधारणत: अडीच ...
मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तसेच इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. साधारणत: अडीच ते तीन हजार रुपयांचा खर्च आता पाच हजाराच्या घरात गेला आहे. वास्तविक कोरोनामुळे अनेकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक उत्पन्नाचा स्रोत कमी झाला असताना, खर्च मात्र भरमसाट वाढले आहेत.
ऐन उपवासाच्या महिन्यातच साबुदाणा, शेंगदाण्याच्या किमती वाढल्या. तेल, डाळी, इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण नसल्याने सर्वसामान्य मात्र हैराण बनले आहेत.
तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च असा
वस्तूवाढलेला खर्च (रुपयात)
खाद्यतेल८००
धान्य१२००
शेंगदाणे १०२
साखर १२०
साबुदाणा१८०
चहापूड५४०
डाळ३४५
गॅस सिलिंडर८९५
पेट्रोल५३५
डिझेल२८०
एकूण४९९७
डाळीशिवाय वरण
डाळींच्या दरात सातत्याने वाढ होत असून डाळ १२० पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे डाळ-भातही महागला आहे. डाळीशिवाय वरणाची वेळ आली आहे. कुठे काटकसर करावी व काय खावे, हा प्रश्न सर्वसामान्यांना भेडसावत आहे. डाळींच्या दरावर नियंत्रणाची आवश्यकता आहे.
खर्च दामदुप्पट..
दरमहा गॅस सिलिंडला हजार रुपये मोजावे लागत आहेत. स्वयंपाकासाठी लागणाऱ्या अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने दरमहाचे बजेट कोलमडत आहे. आर्थिक उत्पन्न ‘जैसे-थे आहे, खर्च मात्र दामदुप्पट होत आहे.
- हर्षला सुतार, गृहिणी
सिलिंडर हजाराच्या घरात
कोरोना काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले असतानाच महागाईमुळे जनता त्रस्त बनली आहे. कोरोना काळात सिलिंडरचे दर दामदुप्पट वाढले आहेत. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर वापरणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. सातत्याने गॅस सिलिंडरचे दर वाढत असल्याने पुन्हा चुली पेटविण्याची वेळ आली आहे.
तेल, डाळी, कडधान्यांच्या किमती वेगाने वाढत आहेत. त्यामुळे नेहमीच्या स्वयंपाकात डाळभात खावा म्हटले तरी, डाळभातही परवडेनासा झाला आहे. सणासुदीच्या दिवसांपेक्षा अन्य दिवसात काय खावे, हाच प्रश्न आहे.
- योगिता राऊत, गृहिणी
जानेवारीतीलसध्याचा
दर दर
शेंगदाणा तेल १६० १७५
सोयाबीन तेल १०२ १६०
शेंगदाणे १०२ १२०
साखर३६-३७४०
साबुदाणा ६४ ९०
मसाले २६० ३६०
चहापूड ५०० ५४०
तूरडाळ ९३ १२०
मुगडाळ ९८ ११५
उडीद डाळ ९८ १२०
हरभरा डाळ ५६ ८५
(प्रत्येक किलो रुपयात)