कोरोना रुग्णालये, लसीकरण केंद्रे आदींबाबत आता घरबसल्या माहिती मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:32 AM2021-04-22T04:32:15+5:302021-04-22T04:32:15+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील कोविड रुग्णालये, लसीकरण केंद्रे आदींसह इतर माहिती जनसामान्यांपर्यंत घरबसल्या मोबाईलवर पोहोचवली जावी या उद्देशाने covidratnagiri.org ...
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील कोविड रुग्णालये, लसीकरण केंद्रे आदींसह इतर माहिती जनसामान्यांपर्यंत घरबसल्या मोबाईलवर पोहोचवली जावी या उद्देशाने covidratnagiri.org हे संकेतस्थळ मंगळवारपासून कार्यान्वित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. रुग्ण संख्या थाेपविणे, हे मोठे आव्हान सध्या जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर उभे आहे. जिल्ह्यात लसीकरणाला वेग मिळत असतानाच शिमगोत्सवाच्या काळात कोरोनाचा संसर्ग लक्षणीय वाढू लागला. साहजिकच, दोन्हीही आघाडींवर लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेची रुग्णसेवेसाठी कसरत होऊ लागली आहे.
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात गावी येऊ लागलेल्या चाकरमान्यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाची साखळी वाढायला सुरुवात झाली होती. त्याची आता पुनरावृत्ती होऊ लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वेगाने प्रभाव वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नागरिकांना कोविड रुग्णालये, लसीकरण तसेच कोरोनासंबंधित इतरही माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या प्रयत्नाने जिल्हा प्रशासनाने covidratnagiri.org संकेतस्थळ सुरू केले आहे.
हे संकेतस्थळ मंगळवार, २० एप्रिलपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. यावर कोविडसंदर्भात माहिती मिळेल. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांची बेड क्षमता, कोविड लसीकरण केंद्रे, कोविड टेस्ट सेंटर्स, रोजचे कोरोनाबाधित, अबाधित, मृत व बरे झालेल्या रुग्णांची माहिती तालुक्यानुसार तसेच संपूर्ण जिल्ह्याची आलेखानुसार (grapha) माहिती मिळेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संकेतस्थळाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.
संकेतस्थळावर मिळणारी माहिती
- कोरोनाविषयक माहिती
- रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांची बेड क्षमतेसह अन्य माहिती.
- कोरोना लसीकरण केंद्रांची माहिती.
- कोविड टेस्ट सेंटर्सची माहिती
रोजचे कोरोनाबाधित, अबाधित, मृत व बरे झालेले रुग्ण.(तालुकानिहाय व संपूर्ण जिल्ह्याची ग्राफनुसार माहिती. Information