ग्रामपंचायतीचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:38+5:302021-06-22T04:21:38+5:30
दापोली : आसूद - मुरूड - कर्दे या दीड किलोमीटरच्या मार्गावर जागाेजागी खड्डे पडले असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. ...
दापोली : आसूद - मुरूड - कर्दे या दीड किलोमीटरच्या मार्गावर जागाेजागी खड्डे पडले असल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना अडचणीचे होत आहे. अखेर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन या रस्त्यावरील खड्डे पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दिव्या घोरपडे हिची निवड
चिपळूण : विद्रोही महिला पॅंथर सेनेच्या चिपळूण तालुका युवती अध्यक्षपदी दिव्या गणेश घोरपडे हिची निवड करण्यात आली आहे. संघटनाप्रमुख मधुताई खरंगुळे यांनी ही निवड केली असून, तिला नियुक्तीपत्रही दिले आहे. या निवडीबद्द्ल दिव्या हिचे अभिनंदन केले जात आहे.
कृषी संजीवनी मोहीम
दापोली : खरीप हंगाम २०२१ यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन करणार आहेत. कृषी संजीवनी ही मोहीम तालुक्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
लोकप्रिय शाहीर स्पर्धा
खेड : शिवशंभू राजे मित्रमंडळ, रसाळगड मुंबई या मंडळाने आयोजित केलेल्या ‘खेड तालुक्याचा लोकप्रिय युवा शाहीर कोण’ या ऑनलाईन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यात किल्लेमाची येथील अक्षय कदम यांना सर्वाधिक ७६५ मते मिळाली असून, ते प्रथम आले आहेत. यात अनेक स्पर्धकांचा सहभाग होता.
रस्त्याची दुरवस्था
दापोली : जालगाव - गव्हे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यात नर्सरीचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावात जाताना खड्डयांतूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.